शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

देवीदास पिंगळे यांच्या त्र्यंबकपिंप्रीच्या फार्म हाउसवर धाड

By admin | Updated: December 24, 2016 01:18 IST

लॉकर ताब्यात : ‘एसीबी’ने आवळला फास

नाशिक : कर्मचाऱ्यांच्या खात्यातून रक्कम काढून घेत बेहिशेबी रोकड प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादीचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना अटक केली असून, रोकडच्या शोधासाठी त्यांच्या मालमत्तेचे झडतीसत्र सुरूच आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. २३) त्र्यंबकपिंप्रीच्या फार्म हाउसवर धाड टाकली. विशेष बाब म्हणजे या फार्म हाउसचा शोध सदर कारवाईमुळे लागल्याची चर्चा आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंगळे यांना अटक करून गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने येत्या रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पिंगळे यांच्या स्थावर व जंगम मालमत्तांचा शोध आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून घेतला जातो आहे. बाजार समितीमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या रकमेवर कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून परस्पर डल्ला मारल्याचा आरोप पिंगळे यांच्यावर असून, त्यांना याच गुन्ह्णात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध न्यायालयापुढे पाच कर्मचाऱ्यांचा गोपनीय कबुली जबाबही नोंदविण्यात आला असून, या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचे सबळ पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पिंगळे यांच्या सहभागाचा पूर्णत: छडा लावून गुन्ह्याचा तपास करत न्यायालयापुढे पुरावे सादर करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंगळेंच्या संपत्तीचा ठावठिकाणा घेण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेदरम्यान शुक्रवारी पिंप्रीच्या फार्महाउसचीदेखील झडती घेण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळणारे उत्पन्न व त्यांच्या नावे असलेल्या मालमत्तेचा ताळमेळ कोठे बसतो का, हा तपासाचा मुख्य भाग आहे. पिंगळेंना अटक केल्यानंतर एसीबीने शहरातील एका घरासह फार्महाउसची झडती घेतली आहे. पिंप्रीच्या फार्महाउसची कुणकुण लागल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने फार्महाउसच्या दिशेने मोर्चा वळविला. याठिकाणी शुक्रवारी दिवसभर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. कारवाईदरम्यान काय हाती लागले ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.(प्रतिनिधी)