शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तिकिटे योग्य उमेदवारांना द्या, इच्छुकांच्या मागणीने खळबळ

By admin | Updated: August 13, 2014 00:43 IST

राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस बैठक

नाशिक : आम्ही खूप कामे केली आहेत, पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात पोहोचवण्याचे काम केले असून, लोकसभेत मोदी लाटेमुळे पराभव झाला. आता मात्र योग्य उमेदवारांना तिकिटे दिल्यास पक्षाला निश्चितपणे यश मिळेल, अशी मागणी करीत अप्रत्यक्षरीत्या उमेदवारीसाठी मागणी करणाऱ्या लोकप्रतिनिधींमुळे राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या बैठकीत खळबळ उडाली.राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसची शहर व जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष आमदार विद्या चव्हाण व निरीक्षक उषाताई दराडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनात मंगळवारी दुपारी झाली. या बैठकीत महिला पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. तसेच महिला पदाधिकारी व महिला लोकप्रतिनिधींना आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रसार व प्रचार कसा करावा, याचे मार्गदर्शन बैठकीत करण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी महिला पदाधिकारी इच्छुक आहेत काय, विधानसभेसाठी काय तयारी केली पाहिजे, याचीही मते जाणून घेण्यात आली. त्यात पक्षाच्या एका विद्यमान आमदाराच्या मतदारसंघातील महिला लोकप्रतिधिनीने आपल्या मनोगतात सांगितले की, आपण कार्यरत असलेल्या पदावरून अनेक लोकहिताची कामे केली. माध्यमांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली तरी आम्ही काम करीत राहिलो. आताही योग्य उमेदवारांना तिकिटे दिल्यास पक्षाला निश्चितपणे यश मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांचा रोख नेमका कोणावर होता, अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती, तर दुसऱ्या एका महिला पदाधिकाऱ्याने आमचा मतदारसंघ कॉँग्रेसला सुटला असला तरी आम्ही मित्रपक्ष असल्याने आघाडीचा धर्म पाळू आणि त्यांना जास्तीत जास्त मते मिळवून देऊ, असे सांंगितले. शहरातील एका महिला पदाधिकाऱ्याने आपल्याला अनेक पदे मिळाली, मात्र अजूनही नेमके काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन मिळाले तर आणखी चांगले काम करता येईल, अशी भावना व्यक्त केली. बैठकीनंतर प्रत्यक्षात किती महिला उमेदवारांनी निवडणुकीसाठी तयारी दाखविली व किती महिला उमेदवारांना पक्ष तिकीट देणार याची निश्चित माहिती प्रदेश नेत्यांना देता आली नाही. बैठकीस यावेळी रेखाताई फष्टे, शुभांगी जगताप, शोभा मगर, जि. प. अध्यक्ष जयश्री पवार, जि. प. सभापती अलका जाधव, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भारती पवार, संगीता ढगे, सुजाता वाजे, कविता कर्डक, माजी जि. प. अध्यक्ष मायावती पगारे, मंगला कदम, अलका साळुंखे, भारती साळवे, कल्पना चुंबळे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)