शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याला शंभर ऐवजी पाचशे रुपये भाव द्या

By admin | Updated: October 29, 2016 00:50 IST

सर्वसाधारण सभा : मका, सोयाबीन खरेदीची मागणी

नाशिक : यंदा कधी नव्हे तो चांगला पाऊस झाल्याने कांदा, मका व सोयाबीनचे चांगले पीक आले आहे. कांद्याला शंभर रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला असून, तो अत्यल्प असल्याने पाचशे रुपये देण्यात यावा. तसेच मका, सोयाबीन या पिकांच्या खरेदीसाठी तालुकास्तरावर खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, असे महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत संमत करण्यात आले.  अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या उपस्थितीत २५ सप्टेंबरची रोखण्यात आलेली सभा शुक्रवारी(दि.२८) जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, उषा बच्छाव, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी आदिंसह सदस्य उपस्थित होते. सभेत मनीषा बोडके यांनी दिंडोरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा ओझरखेड धरणावरून असल्याने या गावांचा पाणीप्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून या गावांसाठी पाणी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी सूचना केली. प्रकाश वडजे यांनी दिंडोरीसाठी जे पाणी राखीव होते. ते पाणी या गावांसाठी आरक्षित ठेवावे, अशी सूचना केली. प्रा. प्रवीण गायकवाड यांनी दरसवाडी पोच कालवा पाणी चाचणी झाली नाही. ती होणे गरजेचे होते. डॉ. भारती पवार यांनी सांगितले की, यंदा पाऊस चांगला झाल्याने कांदा पीक चांगले आले असून, शासनाने कांद्याला शंभर रुपये जाहीर केलेला हमीभाव पाचशे रुपये द्यावा, असा ठराव डॉ. भारती पवार यांनी मांडला तो संमत करण्यात आला. त्यानंतर बाळासाहेब गुंड यांनी चांगला पाऊस झाल्याने मका व सोयाबीनचे उत्पादन चांगले आले आहे. मात्र त्यासाठी तालुका व गट स्तरावर मका व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, असा ठराव संमत मांडला तो संमत करण्यात आला. कुपोषण कमी करण्यासाठी ग्राम बालविकास केंद्रे पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी सूचना डॉ. भारती पवार यांनी मांडली. प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी या योजनेसाठी जिल्हाधिकारी स्तरावरून निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)प्रवेशासाठी थेट अ‍ॅट्रॉसिटीची धमकीदिंडोरी तालुक्यात आत्मामालिक या शिक्षण संस्थेला शिक्षर हक्क कायद्यातून २५ टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्यास थेट जातीवाचक अन्याय प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची धमकी गटशिक्षणाधिकारी यांनी संस्थाचालकाला दिल्याचा आरोप सदस्य डॉ; प्रशांत सोनवणे यांनी केला. प्रवेशसाठी संस्थाचालकांना अशी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची धमकी देऊ नये, असा ठराव डॉ. प्रशांत सोनवणे यांनी मांडला त्यास केरू पवार यांनी अनुमोदन दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी असा ठराव करू नका, अशी विनंती केली. संपतराव सकाळे यांनी माहिती अधिकार कार्यकर्तेही आजकाल अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची धमकी देतात तसेच शिरसाठ नामक कर्मचारीही अशी धमकी देतो, त्यास निलंबित करावे, अशी सूचना केली. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी अशा धमक्या देऊ म्हणून हा ठराव आहे. तो शासनाला तत्काळ पाठवावा, असे आदेश दिले.