शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

दैव देते, कर्म नेते !

By admin | Updated: February 5, 2017 23:00 IST

एबी फॉर्म मिळूनही अपक्ष राहण्याची वेळ

नाशिक : महापालिका निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीपासून तीन महिने अगोदर प्रभागाची रचना व त्यावर पडणाऱ्या आरक्षणाच्या विवंचनेत राहणाऱ्या इच्छुकांनी बदलत्या राजकीय हवेचा अंदाज घेत उमेदवारीसाठी पक्षांतर केले खरे, पण अशा पक्षांतरामुळे काहींना पक्षाची अधिकृत उमेदवारीही मिळाली. परंतु एबी फॉर्ममधील त्रुटी व अर्ज भरण्याची टळून गेलेली मुदत पाहता ‘दैव देते, कर्म नेते’ अशी म्हणण्याची अनेकांना वेळ आली.  नाशिक महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासूनच या निवडणुकीचा अंदाज बांधून असलेल्या इच्छुकांनी आपली रणनिती ठरवून घेतली होती. चार सदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने पॅनलमध्ये कोण असावे येथपासून ते कोणत्या प्रवर्गातून कोण उभे केलेले योग्य ठरेल याची गोळाबेरीजही अनेकांनी करून ठेवली होती. प्रभागात कोणत्या पक्षाची ताकद व हवा आहे याचा अंदाज बांधत, प्रसंगी उडी मारण्याची तयारी ठेवून असलेल्या इच्छुकांनी राजकीय हवामान पाहून दोन महिन्यांपासून पक्षांतरही केले.  विशेष करून भाजपा व शिवसेनेकडेच अशा इच्छुकांचा ओढा असल्यामुळे व निवडणुकीच्या तोंडावर दररोज आयाराम येत असल्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांना ताकद दाखविण्याची संधीच या प्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने मिळाली. त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बाजूला सारून ऐनवेळी प्रवेशकर्त्या झालेल्यांनाच महत्त्व प्राप्त झाले, त्यातून पक्षाकडून उमेदवारी घेण्यासाठी एकेका प्रभागात आठ ते दहा इच्छुकांची भर पडली. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या इच्छुकांमधून उमेदवार निश्चित करताना पक्षाची अडचण झाली खरी, परंतु त्याचबरोबर बंडखोरीच्या भीतीने पक्षाने उमेदवारी देण्यासाठी सर्वच इच्छुकांची अखेरच्या क्षणापर्यंत परीक्षा पाहिली. (प्रतिनिधी)पक्षांतर सत्कारणीउमेदवारी भरण्याच्या अखेरच्या क्षणी काहींच्या हातात पक्षाचे एबी फॉर्म सोपविण्यात आल्याने इच्छुकांचे पक्षांतर सत्कारणी लागल्याची भावना व्यक्त करण्यात आली, परंतु या एबी फॉर्मची तांत्रिक पूर्तता न करण्यात आल्याने, तर काहींना फॉर्मची रंगीत झेरॉक्स एबी फॉर्म म्हणून देण्यात आल्याने त्यांचे अर्ज छाननीत बाद ठरले. अर्ज बाद होणाऱ्यांमध्ये आयारामांची संख्याच सर्वाधिक असल्याने त्यांची अवस्था ‘दैव देते, कर्म नेते’ अशीच झाली आहे.