शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची छेड; पंचवटीत दगडफेक

By admin | Updated: October 18, 2015 22:11 IST

पोलिसासही मारहाण : गुन्हा दाखल

नाशिक : दिंडोरी रोडवरील मायको हॉस्पिटल परिसरातील एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारण्याचा राग येऊन दोन गटांमध्ये झालेल्या वादातून दगडफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्यासही मारहाण झाल्याची घटना घडली आहे़मायको परिसरातील नवरात्रोत्सवात टिपऱ्यांच्या कार्यक्रमानंतर अल्पवयीन मुलीचा हात पकडणाऱ्या मुलास रामदास म्हसू गुंजाळ यांनी जाब विचारला असता त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करून दोघा जोडीदारांना लाल्या व गोट्या (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांना बोलवले. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या सुभद्राबाई गुंजाळ, राजू गुंजाळ यांनी संशयितांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी राहुलवाडीतील १० ते १५ साथीदारांना बोलावून शिवीगाळ करीत पोलीस कर्मचारी राजू गुंजाळ यांच्यासह इतरांना बेदम मारहाण केली़ तसेच परिसरात दगडफेकही केली़या टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड केल्याची घटना पंचवटी पोेलिसांना कळविली असता त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र तोपर्यंत संशयित फरार झाले होते़ दरम्यान, या घटनेत जखमी झालेले पोलीस कर्मचारी गुंजाळ यांना खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अल्पवयीन संशयितासह लाल्या भालेराव, हेमंत भालेराव, चारू भालेराव यांच्यासह सुमारे पंधरा जणांविरोधात विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)