शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबासमोर बालिकेला बिबट्याने उचलून नेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गौरी घरासमोर आपल्या आई, वडील, आजोबा यांच्यासोबत बसली होती. याचवेळी मागून आलेल्या बिबट्याने ...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गौरी घरासमोर आपल्या आई, वडील, आजोबा यांच्यासोबत बसली होती. याचवेळी मागून आलेल्या बिबट्याने गौरीवर हल्ला करून तिला कुटुंबासमोर फरफटत जंगलात ओढून नेण्यास सुरुवात केली. अचानक कोसळलेल्या या संकटामुळे कुटुंब भांबावले आणि त्यांनी गौरीला वाचवण्यासाठी आरडाओरड केली व बिबट्याचा पाठलागही केला. आरडाओरड झाल्याने बिबट्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुडपात गौरीला सोडून देत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. कुटुंबातील सर्वांनी गौरीला ताब्यात घेतले असता, ती गंभीर जखमी झाल्याचे दिसून आले. तिला तातडीने घोटी ग्रामीण रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. पण त्यानंतर प्रकृती बिघडल्याने तिला नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने बुधवारी (दि. २३) दुपारी तिची प्राणज्योत मालवली.

दरम्यान खेडजवळील काननवाडी येथे घटनास्थळी वन विभागाच्यावतीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी २ पिंजरे लावले असून तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी इगतपुरी म. ब. पाटील, वन परिमंडल अधिकारी डी. एस. ढोन्नर, वनरक्षक एम. जे. पडवी, एफ. जे. सैय्यद, सी. डी. गाढर, बी. एस. खाडे, एस. के. बोडके, के. एल. पोटींदे, वनमजूर दशरथ निर्गुडे, श्रावण निर्गुडे, पूणाजी कोरडे, भोरू धोंगडे, मुजीब शेख आदी तळ ठोकून बसले आहेत.

इन्फो

कुटुंबाचा लढा अपयशी...

चिमुकल्या गौरीला बिबट्या फरफटत नेत असताना संपूर्ण कुटुंब तिच्या रक्षणासाठी धावले. त्यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. जिवाच्या आकांताने आरडाओरडा करून हातात असेल ते भिरकावून बिबट्याच्या तावडीतून मुलीला सोडवले. संपूर्ण कुटुंबाने हिम्मत दाखवून लढा दिला. बिबट्याच्या तावडीतून सुटल्यानंतर गौरीला बघून तिच्या मातेने हंबरडा फोडला आणि कुटुंबाने तिला घेऊन उपचारासाठी घोटी, नाशिक येथे दाखल केले. परंतु त्यात तिला वाचवण्यात अपयश आले. याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

--------------------

तीन महिन्यांत तिसरी घटना

इगतपुरी तालुक्यात बिबट्‌याची दहशत कायम असून तीन महिन्यांपूर्वी याच काननवाडी शिवारात एका बालिकेला बिबट्याने हल्ला करून ठार केले होते, तर त्यापाठोपाठ आठच दिवसात एका इसमावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. तीन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. या शिवारात बिबट्यांचा नेहमीच वावर असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात बिबट्यांनी अनेक वेळा बेसावध असणारी लहान बालके व नागरिकांवर हल्ले केले आहेत. बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

फोटो- २३ गौरी बिबट्या

===Photopath===

230621\23nsk_10_23062021_13.jpg

===Caption===

फोटो- २३ गौरी बिबट्या