शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

घोटी बाजार समिती बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:16 IST

बाजार समितीचे मुख्य बाजार आवार घोटी शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असून बाजार आवाराची जागा अत्यंत तोकडी २ एकर जागेत आहे. ...

बाजार समितीचे मुख्य बाजार आवार घोटी शहराच्या मध्यवर्ती वस्तीत असून बाजार आवाराची जागा अत्यंत तोकडी २ एकर जागेत आहे. बाजार आवार बंदिस्त नसून गावातील अनेक नागरी वस्त्यांचे रहदारीचे रस्ते पूर्वीपासून बाजार आवारातून आहेत. त्यामुळे बाजार आवारामध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे, सामाजिक अंतर राखणे, एका गेटमधून प्रवेश आणि दुसऱ्या गेटमधून बाहेर जाणे या बाबींचा अवलंब करणे बाजार समितीला शक्य नाही. बाजार समितीमध्ये पूर्वीपासून लिलाव पद्धत अवलंबली जात नाही. शेतकरी व व्यापारी यांचे वटाव पद्धतीने व्यवहार होत असल्याकारणाने गर्दी टाळणे शक्य होणार नाही. यासह होणाऱ्या विविध अडचणींचे पत्र बाजार समितीच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने कर्मचारी पथक नेमणे बाजार समितीला शक्य होणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

इन्फो

खंबाळे शिवारात खरेदी-विक्री

घोटीजवळील २ किलोमीटर अंतरावर खंबाळे शिवारात भाजीपाला खरेदी-विक्री मोठ्‌या प्रमाणात होत असून या ठिकाणी मुंबई, कल्याण, ठाणे, वसई, पालघर, जव्हार या ठिकाणाहून व्यापारी मोठ्‌या प्रमाणात येत असतात. मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक - जावक होत असते. खंबाळे शिवारात हा बाजार बऱ्याच दिवसांपासून भरत असून यावर कुणाचाही अंकुश नसून मोठ्या प्रमाणात शेकडो गाड्यांचा बाजार या ठिकाणी भरलेला होता. लांबच लांब रांगा महामार्गालगत दिसत होत्या. प्रचंड गर्दीत जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची पायमल्ली होताना दिसत होती.

इन्फो

तातडीची बैठक

प्रशासकीय पातळीवर संध्याकाळी उशिरा चर्चा करून तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटीचे सहा. पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, सहायक उपनिबंधक अर्चना सैंदाने, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय अधिकारी सांगळे यांनी बैठक घेऊन उपाययोजना राबविण्यासाठी आग्रही भूमिका घेतली आणि खंबाळे येथे अँटिजन टेस्ट, तसेच उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार कासुळे यांनी दिली.

फोटो- २४ घोटी बाजार १

खंबाळे शिवारातील भरलेला बाजार.

===Photopath===

240521\24nsk_41_24052021_13.jpg

===Caption===

फोटो- २४ घोटी बाजार १ खंबाळे शिवारातील भरलेला बाजार