शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषय वगळण्याचा घाट

By admin | Updated: September 21, 2016 00:11 IST

शिक्षकांकडून विरोध : वैज्ञानिक संकल्पनाही होणार कमी

नाशिक : विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया मानला जात असतानाही तंत्रनिकेतनमधून विज्ञान विषयाचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या प्रकारास विज्ञान शिक्षकांकडून तीव्र विरोध केला जात असला तरी अद्यापही महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्डाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. नव्या शिक्षणप्रणालीतून विज्ञानच्या अनेक शाखांना बाहेरचा रस्ता दाखविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, राज्यभरातून त्याविरोधात पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण बोर्डाकडून अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. या बोर्डाकडून दर तीन वर्षांनी अभ्यासक्रमात बदल करून त्यास सुसंगत आणि आधुनिक करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानुसार सन २०१७/१८ पासून सुधारित ‘आय’ अभ्यासप्रणाली लागू करण्यात येणार आहे. मात्र या अभ्यासप्रणातील विज्ञान शाखेचे महत्त्व कमी करण्यात आल्याचा आरोप विज्ञान शिक्षकांकडून होत आहे.नवीन अभ्यासक्रम प्रणालीत विज्ञान हा विषय जो आजवर सर्व तंत्रनिकेतन शाखेसाठी प्रथम आणि द्वितीय सत्रात शिकविला जात होता तो मार्यादित करण्यात आला आहे. सदर विषय आता केवळ प्रथम सत्र म्हणजे सहा महिनेच शिकविण्यात येणार असून, उर्वरित सहा महिने संगणक, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स शाखेसाठी देण्यात आले आहेत. तसेच विज्ञानाचे काही घटक हे इतर तांत्रिक विषयांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या निर्णयाविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विज्ञान हा विषय तंत्रज्ञानाचा पाया असल्याने सदर विषय पदविका अभ्यासक्रमातून कमी करू नये, अशी भूमिका तज्ज्ञांनी घेतली आहे. त्यांच्या मते आजवर पदविका अभ्यासक्रमात विज्ञान समाविष्ट असणे हे त्या विषयाचे महत्त्व स्पष्ट करणारे आहे. एका बाजूला केंद्र सरकार डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत वैज्ञानिक शिक्षणाचे महत्त्व व तंत्रज्ञानाची स्वप्ने दाखवित असताना महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन शिक्षण बोर्ड विज्ञानचे महत्त्व कमी करीत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेली २५ ते ३० वर्ष विज्ञान विषय अभ्यासक्रम असताना अचानकपणे ते वगळण्यात येऊ नये, असे तज्ज्ञांचे मत आहे. विज्ञान हा विषय दोन्ही सत्रात ठेवून विद्यार्थ्यांचे सामान्य विज्ञान व वैज्ञानिक संज्ञा पक्के करून त्यानंतरच त्यावर आधारित तांत्रिक विषय शिकविल्यास विद्यार्थ्यांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)