शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रीट डिझायनरचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:18 IST

शहरातील विविध रस्त्यांचे सुविधायुक्त सुशोभिकरण करण्यासाठी स्ट्रीट डिझायनर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या आठवड्यात डिझायनर नियुक्तीवरून संशय व्यक्त करणाºया सदस्यांचे शंका- समाधान झाल्याने गुरुवारी (दि.७) स्थायी समितीच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली.

नाशिक : शहरातील विविध रस्त्यांचे सुविधायुक्त सुशोभिकरण करण्यासाठी स्ट्रीट डिझायनर नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या आठवड्यात डिझायनर नियुक्तीवरून संशय व्यक्त करणाºया सदस्यांचे शंका- समाधान झाल्याने गुरुवारी (दि.७) स्थायी समितीच्या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली.महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी स्ट्रीट डिझायनर नियुक्तीचा प्रस्ताव पुन्हा चर्चेसाठी मांडण्यात आला होता. यावेळी सभापतींच्या आदेशानुसार शहर अभियंता उत्तम पवार यांनी प्रस्तावाची माहिती देताना, शहरातील रस्ते, पदपथ, प्रसाधनगृह आणि अन्य साधनांनीयुक्त असावे यासाठी मुंबई, पुणे, ठाणे महापालिकांनी स्ट्रीट डिझायनर नियुक्त केले आहेत. त्याच धर्तीवर हा प्रस्ताव असल्याचे सांगितले. मुंबई महापालिकेने १२ लाख रुपये, पुणे महापालिकेने नऊ लाख रुपये प्रतिकिलो मीटर या दराने कामे दिली असून नाशिक महापालिकेने दहा लाख रुपये प्रतिकिलो मीटर या दराने रस्ते डिझायनिंगचे काम देण्याचा प्रस्ताव मांडल्याची माहिती दिली. चर्चेत मुशीर सय्यद यांनी भाग घेतला. तो वगळता गेल्यावेळी विविध शंका उपस्थित करणाºया कोणत्याही सदस्याने चर्चा केली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सभापतींनी जाहीर केले. गेल्यावेळी सदरचा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा या प्रस्तावाविषयी शंका घेण्यात आल्या होत्या. तसेच डिझायनरचे दर जास्त आहेत. शहरात पाचशे किलोमीटरचे रस्ते करण्यासाठी चाळीस कोटी रुपये केवळ डिझायनरला मोजायचे काय असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र अखेरीस हा प्रस्ताव कोणत्याही विरोधाशिवाय मंजूर करण्यात आला. दरम्यान, गणेश मूर्तींची निर्गमित करण्यासंदर्भातील एक आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यासंदर्भातदेखील लवटे यांच्या तक्रारीवरून सभापती गांगुर्डे यांनी अशाप्रकारचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर पसरवून वातावरण कलुषित करणाºयावर कारवाई करण्याचे आदेश दिले. बिटको रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी हे व्यवसायरोध भत्ता घेतात, परंतु खासगी व्यवसायही करत असल्याची तक्रार मुशीर सय्यद यांनी केली होती. त्याच आधारे संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश सभापती गांगुर्डे यांनी दिले.