शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रम विकासाचे स्वातंत्र्य मिळावे

By admin | Updated: January 24, 2017 23:36 IST

पठाण : मविप्रच्या विविध माहााविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे पदवीग्रहण

नाशिक : बदलत्या परिस्थितीनुसार आधुनिक जगाला आवश्यक असलेली गुणवत्ता भारतीय विद्यार्थ्यांमध्ये आहे. परंतु, परंपरागत पद्धतीने चालत आलेली शैक्षणिक पद्धती आणि अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षित प्रगतीला वाव मिळत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना परदेशातील स्वायत्त महाविद्यालये तथा विद्यापीठांप्रमाणे भारतातही महाविद्यालयांना विविध क्षेत्रांत संशोधनात्मक व विकासात्मक प्रगती साधणारा अभ्यासक्रम विकसित करण्याचे स्वातंत्र्य मिळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण यांनी केले.  केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अ‍ॅड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी, औषधनिर्माण, वास्तुशास्त्र, विधी व अ‍ॅड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त पदवीग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.  व्यासपीठावर अध्यक्षस्थानी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या समवेत सभापती अ‍ॅड. नितीन ठाकरे, प्रा. बी. एन. शिंदे, डॉ. के. एस. होळकर, डॉ. पी. एस. बस्ते, डॉ. एस. टी. गडाख आदि उपस्थित होते. पठाण म्हणाले, पाऊस, वने, जमीन ही ज्याप्रमाणे राष्ट्राची संपत्ती आहे, त्याचप्रमाणे ज्ञानसंपन्न युवा पिढीही राष्ट्राची संपत्ती आहे. या ज्ञानसंपत्तीच्या जोरावर भारत भविष्यात संपूर्ण जगावर राज्य करू शकतो. त्यासाठी येथील शैक्षणिक पद्धतीत काळानुरूप बदल होण्याची गरज व्यक्त करतानाच  त्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे पठाण यांनी आवाहन  केले. तर नीलिमा पवार यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्रगत तथा  उज्ज्वल भारताचे नेतृत्व करावे, असे आवाहन केले. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती गटणे यांनी, तर प्राचार्य डॉ. प्राजक्ता बस्ते आभार मानले. (प्रतिनिधी)