झिरवाळांकडून गावित यांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:48 PM2019-10-24T23:48:36+5:302019-10-25T00:28:11+5:30

दिंडोरी- पेठ मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर गावित यांना 60542 मतांनी पराभूत करुन विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी गड कायम राखला आहे.

 Gavit defeated by Zirwala | झिरवाळांकडून गावित यांचा पराभव

झिरवाळांकडून गावित यांचा पराभव

googlenewsNext

दिंडोरी : दिंडोरी- पेठ मतदारसंघात शिवसेनेच्या भास्कर गावित यांना 60542 मतांनी पराभूत करुन विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी गड कायम राखला आहे.  तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असताना माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासोबत त्यांचे समर्थकही शिवसेनेत दाखल झाल्याने तालुक्यात शिवसेना प्रबळ दावेदार मानले जात ैहोते. मात्र सरळ लढतीत राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांना पराभूत करण्याचे शिवसेनेचे मनसुबे निकालानंतर सपशेल खोटे ठरले.
शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा होती. लोकसभेला राष्ट्रवादीत गेलेले माजी आमदार धनराज महाले स्वगृही परतले तर माजी आमदार रामदास चारोस्कर हेही सेनेत आले. सुरुवातीला महाले यांनी उमेदवारी मिळविली मात्र त्यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश डोखळे यांनी विरोध करत उमेदवारी बदल करण्यात यश मिळवले. दोन्ही माजी आमदारांच्या स्पर्धेत पेठचे तालुकाप्रमुख भास्कर गावित यांना उमेदवारी मिळाली. दिंडोरीत पूर्व भागातील शिवसेनेचे परंपरागत मते मिळतील ही शिवसेनेची आशा मतदारांनी फोल ठरवत पेठ तालुक्यात शिवसेनेला अल्पशी आघाडी दिली मात्र दिंडोरीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत राष्ट्रवादीला भरभरून मते देत शिवसेनेचे गणित बिघडवले. चारोस्कर व महाले हे जरी शिवसेनेसोबत राहिले मात्र त्यांच्या समर्थकांनी उघड राष्ट्रवादीला साथ देत नाराजी मतदानातून व्यक्त केली. सरळ लढतीतील धोका ओळखत राष्ट्रवादीचे आमदार झिरवाळ यांनी माकपाचा उमेदवार न देता त्यांचा पाठींबा घेत शिवसेनेला पेठसोबत दिंडोरीच्या पूर्व भागात रोखण्याचा डाव यशस्वी करत मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळविला.
विजयाची तीन कारणे...
आमदार नरहरी झिरवाळ यांची साधी राहणी तसेच पेठ व दिंडोरी तालुक्यातील जनतेशी असलेला सततचा संपर्क, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आग्रही भूमिका.
मांजरपाडा वळण योजना, लघु पाटबंधारे आदी दीर्घकालीन फायद्याच्या योजना केल्याने जनतेत कामाचा माणूस म्हणून प्रतिमा.
माकपा व माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले यांच्या नाराज समर्थकांची मिळालेली मदत तसेच मतदारसंघात केलेली विकासकामे हिताची ठरली.
गावितांच्या पराभवाचे कारण...
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तो पुन्हा बदलल्याने माजी आमदार धनराज महाले यांच्या समर्थकांची तसेच इच्छूक उमेदवार रामदास चारोस्कर यांच्या समर्थकांची साथ मिळविण्यात अपयश, होमपीच असलेल्या पेठ तालुक्यातून तसेच खेडगाव, मोहाडी गटातून मिळालेला अल्प प्रतिसाद.
दिंडोरी-पेठ अशा प्रादेशिक अस्मितेच्या मुद्यासोबतच अगोदर घोषित शिवसेनेची उमेदवारी नंतर बदलली गेल्याने त्यातून उद्भवलेल्या नाराजीचा लाभ उचलत झिरवाळ यांनी विजयश्री गाठली.
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
१ भास्कर गावित शिवसेना 63542
२ अरु ण गायकवाड वंचित ब. आ. 13436
३ टी. के. बागुल मनसे 3137
४ जना वतार बसपा 2015

Web Title:  Gavit defeated by Zirwala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.