शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

कचरा डेपोला तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:13 IST

गेल्या ४० वर्षांपासून वडगाव बल्हे भागात असणारा येवला नगर परिषदेचा कचरा डेपो तत्काळ हटवून पर्यायी कचरा डेपोची व्यवस्था येवला पालिकेने करावी यासाठी वडगाव बल्हे येथील सरपंचासह सर्वच ग्रामस्थांनी येवला पालिकेसमोर गुरुवारपासून (दि. ७) आमरण उपोषणास सुरुवात केली. दरम्यान उशिरा पालिकेने समाधानकारक पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. पालिकेने ठोस कार्यवाही केली नाही तर रास्ता रोकोचा इशारा वडगाव ग्रामस्थांनी दिला आहे.

येवला : गेल्या ४० वर्षांपासून वडगाव बल्हे भागात असणारा येवला नगर परिषदेचा कचरा डेपो तत्काळ हटवून पर्यायी कचरा डेपोची व्यवस्था येवला पालिकेने करावी यासाठी वडगाव बल्हे येथील सरपंचासह सर्वच ग्रामस्थांनी येवला पालिकेसमोर गुरुवारपासून (दि. ७) आमरण उपोषणास सुरुवात केली. दरम्यान उशिरा पालिकेने समाधानकारक पत्र दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. पालिकेने ठोस कार्यवाही केली नाही तर रास्ता रोकोचा इशारा वडगाव ग्रामस्थांनी दिला आहे.ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून उपोषणा-बाबत मध्यस्थी करण्याची भूमिका निभावली. हुडको वसाहतीच्या निर्मितीसाठी १९८० पासून येवल्याचा कचरा डेपो वडगाव बल्हे शिवारातील सुमारे साडेपाच एकर जमिनीवर हलवला आहे. कचºयापासून होणारे खत आपल्या शेतीला उपयोगी ठरेल, अशा आश्वासनाने येथे कचरा डेपो सुरू झाला. याच वडगाव बल्हे येथील गट नंबर १९ मध्ये अडीच हेक्टर क्षेत्रात येवला नगर परिषद शहराचा कचरा गेल्या अनेक वर्षापासून आणून टाकत आहे. तेव्हापासून शहराचा कचरा येथे साठवला जात आहे. नगरपालिकेस गावकºयांनी गेल्या ३७ वर्षांपासून सहकार्य केले आहे. परंतु आता हा त्रास लोकांना सहनशीलतेपलीकडे गेला आहे. ग्रामस्थ प्रत्येक ग्रामसभेच्या वेळेस सरपंच व ग्रामसेवक यांना वेठीस धरीत असून, कामकाज बंद पाडत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही कचरा डेपो हटवला जात नाही. नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी शेख यांना दिलेल्या निवेदनाला महिना उलटून गेला तरी कार्यवाही होत नाही. नगरपालिकेने आतापर्यंत याबाबत काहीही केले नाही. त्वरित निर्णय घेऊन कचरा डेपोची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. या गावातील ग्रामस्थांना कचरा डेपोपासून होणारा त्रास थांबवावा. कचरा डेपो न हटवल्या गेल्यास रस्त्यावर कचरा फेकून रहदारी बंद करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. येवला पालिकेच्या बाहेर सरपंच मीराबाई कापसे, उपसरपंच हर्षदा पगारे, वंदना कापसे, आशा जाधव, बाळासाहेब कापसे, अशोक जाधव, छाया मोरे, सुमन कापसे, जिजाबाई जाधव, मथुरा गायकवाड, अनिल मोरे, गणेश कापसे यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत. अशोक पैठणकर, जितेश पगारे, भास्कर संसारे, नितीन संसारे, कृष्णदास जमधडे, संजय पवार यांनी उपोषणात सहभाग घेतला.