शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘गार्बेज एटीएम’ मधून करा कचरा संकलन

By admin | Updated: September 15, 2016 00:50 IST

पॉइण्ट रिडीमने मोबाइल रिचार्ज : शॉपिंग करणेही होते सहज शक्य

पंतप्रधान मोदींनी साद घातलेल्या ‘स्वच्छ अभियान’ उपक्रमाला साद देत संदीप फाउंडेशन महाविद्यालयातील विद्युत शाखेतील विद्यार्थ्यांनी कचरा संकलनासाठी अनोख्या एटीएम प्रकल्पाची निर्मिती केली आहे. या प्रकल्पाअंतर्गत कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला विशिष्ट पॉइण्ट प्राप्त होणार असून या पॉइण्टद्वारे शॉपिंग, मोबाइल रिचार्ज करणे सहज शक्य होणार आहे.संदीप फाउंडशेन महाविद्यालयातील विद्यार्थी यश गुप्ता, प्रकाश सोनवणे, राहुल पाटील आणि ऋ षिकेश कासार यांनी हा प्रकल्प साकारला असून या विद्यार्थ्यांना कृतिका अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. या गार्बेज एटीएममध्ये कचरा टाकण्यासाठी कार्ड उपलब्ध करून देण्यात येते आणि या कार्डमध्ये कचरा टाकल्यानंतर पॉइण्ट जमा होत जातात. या कचरा संकलनातून पॉइण्ट मिळत असल्याने इतस्त: कचरा फेकण्याचे प्रमाण कमी होणार आहे. या प्रकल्पामुळे जास्तीत जास्त कचरा संकलन होण्यास मदत होणार असून पर्यायाने परिसर स्वच्छ होण्यास मदत होईल, परिसर स्वच्छ असल्याने आपोआपच रोगराई तसेच आजार कमी होण्यास मदत होणार आहे. विविध पातळीवर या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवल्यास गाव, शहर, राज्य, देश स्वच्छ होण्यास हातभार लागून स्वच्छ आणि शुद्ध हवा तयार होऊन प्रसन्न वातावरण निर्मितीस चालना मिळणार आहे.या प्रकल्पाला राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला होता तसेच जवाहर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्र मांक, तर शताब्दी इन्स्टिट्यूट येथील स्पर्धेत द्वितीय, औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या कचरा संकलनातून भरलेले गार्बेज एटीएम रिकामे होण्यासाठी घंटागाडीची सुद्धा व्यवस्था करता येणे सहज शक्य होणार आहे. या प्रकल्पासाठी पेटंट मिळावे यासाठी मुंबईला अर्जदेखील दाखल करण्यात आला आहे.