शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर, दारणामधून विसर्ग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:14 IST

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर, दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला. गंगापूर धरण ७५ टक्के भरल्याने धरणातून पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला. सध्या १ हजार ६६४ क्यूसेक विसर्ग सुरू आहे, तर दारणातून १३ हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नांदूरमधमेश्वर धरणातून २४ हजार ७४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने मराठवाड्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणाचा जलसाठा वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.  इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून अडीच हजार क्यूसेक, तर दारणातून ११ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असताना दोन दिवसांपूर्वी पाण्याचा जोर ओसरल्याने विसर्गातही कपात करण्यात आली होती. परंतु, गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या संततधार पावसामुळे पुन्हा एकदा विसर्ग वाढविण्यात आला आहे.  सध्या गंगापूर धरणातून एक हजार ६६४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, दारणा धरणातून १३ हजार ७०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग होत असून, नांदूरमधमेश्वर धरणातून १४ हजार ७४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्णातील पश्चिम पट्ट्यात पावसाने चांगलाच जोर धरला  आहे.  गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांची पातळी चांगलीच वाढली आहे. नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, निफाड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. दारणा आणि नांदूरमधमेश्वर धरणातून गेल्या दिवसांपासून विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरणाची पातळीही ७५ टक्के झाली असून, दारणा धरण ८३ टक्के भरले आहे.