शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By admin | Updated: May 12, 2017 01:41 IST

नाशिक : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या दरोडेखोरांसह अट्टल घरफोड्यांची टोळी शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केली आहे. लाखलगाव जवळील पेट्रोलपंपावर पडलेल्या दरोड्यातील संशयिताचा माग काढताना पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला.संशयितांकडून गावठी कट्टा, जिवंत काडतुसांसह एक मोटार, पाच दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने, दहा मोबाइल असा एकूण सात लाख १६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पेट्रोलपंपावरील दरोड्यामधील संशयिताची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच्यावर पाळत ठेवून खात्री पटल्यानंतर मखमलाबाद येथील कोळीवाडा परिसरातून नितीन निवृत्ती पारधी या संशयिताला पोलिसांनी अटक केली.पोलीस कर्मचारी विशाल काठे, मोहन देशमुख, विशाल देवरे, स्वप्नील जुंद्रे, शांताराम महाले यांनी पारधीच्या मुसक्या आवळून ‘खाकी’चा हिसका दिल्यानंतर त्याने विविध गुन्ह्यांची कबुली देत त्याच्या साथीदारांसह मुद्देमालाची माहिती दिली. पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या टोळीला जेरबंद करण्यात आले.