शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

गणेश अहिरेंच्या अडचणीत वाढ

By admin | Updated: March 9, 2017 01:35 IST

नाशिक : पठावे दिगर गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

नाशिक : पठावे दिगर गटातून अपक्ष म्हणून निवडून आलेले जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचे चित्र आहे. आधी त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आणि नंतर ते दबावाखाली स्वीकारल्याचे सांगून आपण अपक्षच असल्याचे दिलेले प्रतिज्ञापत्रावरील निकाल जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राखीव ठेवला आहे.दरम्यान, अध्यक्षपदाची निवडणूक २१ मार्च रोजी होत असून, राष्ट्रवादी कॉँग्रेसने जर गणेश अहिरे यांना सहयोगी सदस्य म्हणून अमुक एका पक्षाला मतदान करण्याचा व्हीप बजावला तर गणेश अहिरेंची गोची होणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी ‘इकडे आड, तिकडे विहीर’ या कचाट्यात गणेश अहिरे सापडले आहेत.गणेश अहिरे यांना आदिवासी क्रांती संघटनेने पुरस्कृत करीत अपक्ष म्हणून निवडून आणल्याचा दावा केला होता. मात्र एका शिक्षण संस्थेचे शिक्षक असलेले गणेश अहिरे यांनी लगोलग राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारल्याने त्यांची आदिवासी विकास आघाडीच्या नेत्यांनी गणेश अहिरे यांना याबाबत जाब विचारला होता. त्यामुळे काहीशी नरमाईची भूमिका घेत अपक्ष जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांनी लगेचच दोन दिवसानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करीत, आपण दबावाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले असून, आपण अपक्ष म्हणून निवडून आलो असून, आपल्याला कोणत्याही संघटनेचा मसुदा लागू होत नसल्याचे कळविले होते. जिल्हा प्रशासनाने मात्र यावर सावध भूमिका घेत अद्याप गणेश अहिरे यांच्या अर्जावर निकाल दिलेला नाही. निवडणूक आयोगाकडून याबाबत मार्गदर्शन मागविण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र मार्गदर्शन २१ मार्चच्या आत आले तर ठीक आहे अन्यथा गणेश अहिरेंना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या म्हणण्यानुसार त्या पक्षाने बजावलेल्या व्हीपनुसार मतदान करावे लागेल, अन्यथा त्यांचे जिल्हा परिषद सदस्यपद धोक्यात असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)