शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त योजनेचा आटला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 00:46 IST

डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली आहेत. या कामासाठी विविध १७ लेखाशिर्षमधून निधी मिळत असला तरी तो अत्यल्प असल्याने कामांना गती मिळणेही कठीण झाले आहे.

ठळक मुद्देकामे पुढे सरकेना : कामे पूर्ण करण्याची कसोटी

नाशिक : डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली आहेत. या कामासाठी विविध १७ लेखाशिर्षमधून निधी मिळत असला तरी तो अत्यल्प असल्याने कामांना गती मिळणेही कठीण झाले आहे.राज्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जलयुक्तशिवार योजनेची मुदत दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी संपल्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. मात्र या योजनेतील कामांसाठी रोजगार हमीसह, लघुपाटबंधारे, कृषी अशा अन्य विभागांच्या लेखाशिर्षमधून निधी दिला जातो. परंतु सदर निधी अत्यल्प असल्यामुळे उत्तर महाराष्टÑातील कामे गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत पुढे सरकणे कठीण होऊन बसले आहे. जसा निधी उपलब्ध होईल तशी कामे करावी लागत असल्याने उत्तर महाराष्टÑातील सुमारे दीड हजार कामांची कसोटी लागणार आहे.उत्तर महाराष्टÑात जलयुक्त शिवार अभियान २०१८-१९ अंतर्गत ११२३ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांमधून एकूण १९,८३८ गावांमध्ये जलयुक्तची कामे मागीलवर्षी हाती घेण्यात आली होती. दि. ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय निधीची तरतूद तत्कालीन फडणवीस सरकारने केली होती. परंतु आता या कामांची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या कामांसाठी निधीची तरतूद केलेली नाही. या कामांसाठी अन्य स्त्रोताच्या माध्यमातून मिळणाºया निधीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे गेल्या चार महिन्यांत नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नगर जिल्ह्यांमधील कामांचे भवितव्य अंधारात आले आहे.फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत नाशिक जिल्ह्यात ७० कामे, धुळे जिल्ह्यात १९७, नंदुरबार जिल्ह्यातील ४५६, जळगावमधील ७१८, तर नगर जिल्ह्यातील ३८ याप्रमाणे १४७९ कामांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.कामाची संथ गतीचार महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्याचे काम ९८ टक्के झाले होते ते फेब्रुवारी १४ पर्यंत ९९ टक्के, धुळे जिल्ह्याचे काम ८६ वरून ८८, नगर जिल्ह्यातील काम ९९ टक्के असलेले काम कायम आहे. जळगाव ८२ टक्केवरून ८३ टक्के, तर नंदुरबार ७६ वरून ७९ टक्केइतकेच पुढे सरकले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारJalyukt Shivarजलयुक्त शिवार