शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

निधी मिळाला, कामे बदलण्याची धावपळ आमदारांची धावाधाव : दोन कोटी खर्चात अग्रेसर

By admin | Updated: September 5, 2014 00:34 IST

निधी मिळाला, कामे बदलण्याची धावपळ आमदारांची धावाधाव : दोन कोटी खर्चात अग्रेसर

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन महिन्यांपूर्वी आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी देण्यात आलेले दोन कोटी रुपये खर्ची पाडण्यास जिल्ह्यातील सर्वच आमदार अग्रेसर असल्याचे आढळून आले असून, या निधीतून विकासकामे सुचविल्यानंतर आता मतदारसंघाचा दौरा करताना पाच वर्षे अविकसित राहिलेल्या भागाची जाणीव होऊन कामे बदलण्यासाठी धावाधाव सुरू झाली आहे. विशेष करून एकाच कामावर एक कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्या रकमेत मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये तीन ते चार कामे करण्याचा सपाटा आमदारांनी लावला आहे. त्यासाठी यापूर्वी सुचविलेली कामे रद्द करून, नवीन कामांसाठी निधीची उपलब्धता, प्रशासकीय मान्यता मिळवून झटपट त्याचे भूमिपूजन करून फलकही लावण्यास सुरुवात झाली आहे. (पान २ वर)यात जवळपास सर्वच आमदारांचा पुढाकार असून, निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वीच कामांना मंजुरी व ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यासाठी धावाधाव केली जात आहे. मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी आमदारांना दरवर्षी दोन कोटी रुपये शासनाकडून उपलब्ध करून दिले जातात. सलग चार वर्षे मिळालेल्या निधीतून आमदारांनी आपापल्या मतदारसंघात तातडीच्या व निकडीच्या कामांवर खर्च केला. सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातच विधानसभेची निवडणूक होत असल्यामुळे विद्यमान आमदारांना चालू आर्थिक वर्षासाठी निधी मिळेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात असताना, निवडणुकीचे वर्ष म्हणून राज्य सरकारने विद्यमान आमदारांना प्रत्येकी दोन कोटी रुपयांचा निधी एप्रिल महिन्यानंतर उपलब्ध करून दिला. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता असल्याने आमदारांना आपापल्या मतदारसंघात दोन कोटी रुपये विकासकामांवर खर्च करण्यासाठी धावपळ करावी लागली. आॅगस्ट अखेरच जवळपास सर्वच आमदारांनी दोन कोटी रुपये खर्चाचे नियोजन केले, परंतु जून, जुलैमध्ये मतदारसंघाचा दौरा करताना अनेक गावांमध्ये पाच वर्षांत कोणतीही कामे न झाल्यामुळे मतदारांकडून नाराजी व्यक्त होत असल्याचे पाहून भानावर आलेल्या आमदारांनी अगोदर रस्ते व मोठ्या बांधकामांवर सुचविलेला निधी पुन्हा परत घेऊन छोटी छोटी खेडी व गावांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी वळविला आहे. विशेष करून समाजमंदिर व सभामंडपावर भर दिला जात असून, कारण त्यावर आमदाराचे कायमस्वरूपी नाव लावले जाणार आहे.