शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST

चौकट- तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक खाद्य तेल एकदा किंवा दोनदा वापरले तर ते चालू शकते. पण त्याच तेलाचा वारंवार ...

चौकट-

तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक

खाद्य तेल एकदा किंवा दोनदा वापरले तर ते चालू शकते. पण त्याच तेलाचा वारंवार वापर केल्यामुळे त्यात बनविलेल्या पदार्थांमुळे विविध आजार जडण्याचा धोका असतो. वारंवार तेच तेल वापरल्यामुळे त्यातील जीवनसत्वे नाहीसे होतात. त्यापासून आपल्या शरीरास आवश्यक असलेले कोणतेही घटक मिळत नाहीत.

चौकट-

रस्त्यावर न खाल्लेलेच बरे

रस्त्यांवरील हातगाड्यांवर अनेक चमचमीत पदार्थ आपल्याला आकर्षित करत असले तरी हे पदार्थ अनेकवेळा एकाच तेलात बनविले जातात. यामुळे शरीरातील फॅट अधिक वाढतात. यामुळे लठ्ठपणाबरोबरच इतर विकारांना निमंत्रण दिल्यासारखे आहे. बाहेरच्या खाण्याने अनेकवेळा पोटाचे विकार होतात. पावसाळ्यात तर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. यामुळे बाहेरचे पदार्थ या काळात वर्ज्य केलेलेच बरे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

कोट-

चांगल्या पेशींना बसतो धक्का

अनेकवेळा उकळलेले खाद्य तेल काळे पडते. त्यामुळे त्यात शरीराला घातक ठरू शकतील असे अनेक घटक निर्माण होतात. या तेलामध्ये बनविलेले पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरात कोलेस्टेराॅल वाढते. यामुळे शरीरातील चांगल्या पेशींना धक्का बसून हृदयविकार, कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात. - डॉ. किरण बिरारी, एम. डी. मेडिसिन

कोट-

अपचनाचा त्रास शक्य

तेल वारंवार तापविल्यामुळे त्यातील जीवनावश्यक असलेले बहुतेक घटक जळून गेलेले असतात. त्यातून माणसांच्या शरीरास आवश्यक असलेले कोणतेही घटक मिळत नाहीत, अशा तेलांमध्ये बनविलेल्या पदार्थांमुळे अपचनाचा त्रास सुरू होऊ शकतो. वारंवार वापरल्यामुळे तेलामधील जीवनसत्व निघून गेलेली असतात. - डॉ. प्रकाश पाटील, गंगापूर रोड

चौकट-

...तर होईल गुन्हा दाखल

खाद्यतेल वारंवार उकळल्याने त्यात निर्माण होणाऱ्या घटकांमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यासंदर्भात सर्व हॉटेल चालक, मिठाई विक्रेते यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी बैठक घेण्यात आली. याबाबतचे सर्व नियम समजावून सांगण्यात आले असून याउपरही कुणी असे करताना आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. याशिवाय ५० लिटरपेक्षा जास्त तेल वापरणाऱ्यांना त्याचे रेकॉर्ड ठेवण्याचे बंधन घालण्यात आले आहे. - गणेश परळीकर, सहायक आयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग

चौकट-

अहो आश्चर्यम! एकावरही कारवाई नाही

अनेक हॉटेलचालक किंवा रस्त्यावरील हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणारे विक्रेते वारंवार त्याच तेलाचा वापर करताना दिसून येतात. मात्र अद्यापपर्यंत कुणावरही कारवाई झालेली नाही.