शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यप्रेम; मात्र ध्वजाविषयी अपुरे ज्ञान

By admin | Updated: August 14, 2016 23:42 IST

सर्वेक्षण : रंग, संख्येवर आधारित प्रश्नांची उत्तरे सांगणे कठीण

 स्वप्नील जोशी नाशिक :तिरंगा ध्वजाचे तीन रंग कोणते, त्या रंगांचा आशय काय आणि अशोकचक्राला किती आरा आहेत... म्हणायला तीन सोपे प्रश्न...परंतु देशाचा ६९ वर्धापन दिन असतानादेखील त्याविषयी अनेक जण अनभिज्ञ आहेत. लोकमतने स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या सर्वेक्षणात ही बाब आढळली आहे.सोमवारी १५ आॅगस्ट साजरा होणार असून, अशा दिवशी सर्वांनाच देशप्रेम आठवते. सोशल मीडियावर तर शुभेच्छांची मोठ्या प्रमाणात देवाण-घेवाण होत असते. मात्र असा राष्ट्राभिमान बाळगताना त्यातील साऱ्याच बाबी माहीत असणे गरजेचे आहे. किंबहुना मूलभूत माहितीही नसल्याचे आढळते. ‘लोकमत‘च्या वतीने पन्नास जणांच्या सर्वेक्षणात प्रकर्षाने ही बाब जाणवली. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सणच आहेत, परंतु स्वातंत्र्यदिन कोणता प्रजासत्ताक दिन कोणता असेही अनेकांना सांगता येत नाही. विशेषत: नव्या पिढीत जेथे स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या वर्गामुळे जगाचे ज्ञान मिळते असा एक वर्ग असताना दुसरीकडे असाही युवा वर्ग आहे की त्याला पुरेसे ज्ञान नाही. लोकमतने सर्व्हे करताना युवक, युवती आणि गृहिणी अशा वेगवेगळ्या घटकांना तीन प्रश्न विचारलेत आणि त्यांना देशाच्या स्वातंत्र्याविषयी प्रेम असले तरी प्रत्यक्षात मात्र राष्ट्रध्वजाविषयी कितपत ज्ञान आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रध्वजातील रंगाची क्रमवारी, या तिन्ही रंगांचे महत्त्व आणि अशोकचक्रात किती आऱ्या आहेत, हे तीन साधे सोपे प्रश्न होते. पैकी रंगाची क्रमवारी सांगणे सोपे असले तरी त्यातही पंधरा टक्के नागरिकांना क्रमवारी सांगता आली नाही. रंगाचे महत्त्व सांगताना ३५ टक्के नागरिकांना ते सांगता आले नाही. राष्ट्रध्वजातील अशोकचक्रावरील आऱ्या किती याबाबत चाळीस टक्के व्यक्तींना सांगता आले नाही.