शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

कांदा व्यापाऱ्याची सहा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:14 IST

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथील कांदा व्यापारी सुमित सुभाष समदडीया यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनीचा एकूण ५२९ गोण्यांतील सुमारे ...

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला येथील कांदा व्यापारी सुमित सुभाष समदडीया यांच्या अमोल ट्रेडिंग कंपनीचा एकूण ५२९ गोण्यांतील सुमारे ६ लाख ३२ हजार ४६ रुपये किमतीचा कांदा संशयितांनी परस्पर विकला. संशयितांनी इतर व्यक्तींच्या नावावर असलेले सिमकार्ड व फोन वापरून तसेच ट्रान्स्पोर्ट मालक यांना फोन करून ट्रकला बनावट नंबरप्लेट लावली. कांदा व्यापारी समदडीया यांचा कांदा ओडिसा (कोयकाबाजार) येथील चंदनेश्‍वर एंटरप्रायजेस येथे पोहोच करण्यासाठी विश्‍वासाने त्यांना गाडीत भरून दिला असता कांदा ओडिसा येथे पोहोच न करता परस्पर अन्यत्र विक्री करून फसवणूक केली. या प्रकरणी समदडीया यांच्या फिर्यादीवरून संशयित प्रवीण एकनाथ अहिरे (रा. श्रीरामनगर, नाशिक), आशिष भिकन गांगुर्डे (रा. गणपतनगर, नाशिक), प्रेम अशोक खलसे (रा. इच्छामणीनगर, नाशिक), सादिक युसूफ पटेल (रा. संजयनगर, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे, पंकज ऊर्फ बंदी शिंदे, रा. आडगाव, जि. नाशिक) यांच्यासह पिंपळनेर (ता. साक्री) येथील इतर तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इन्फो

दोघा अल्पवयीन मुलांचा समावेश

पोलिसांनी संशयित प्रवीण अहिरे यला ताब्यात घेतले असता सादिक पटेल या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने कांदा उतरून घेत कांदा सटाणा येथे विक्री केल्याचे उघड झाले. दरम्यान, संशयितांकडून ३० हजार रुपये रोख, ३ मोबाईल्स, १५ लाख रुपये किमतीचा ट्रक (एमएच १५ जीव्ही ८२२५), ३ लाख रुपये किमतीची इंडिगो कार (एमएच ०२ सीआर ६०३३) असा एकूण १८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणातील अल्पवयीन संशयित आशिष गांगुर्डे, प्रेम खलसे यांच्याकडे चौकशी करून त्यांना बाल न्याय मंडळात हजर राहण्याचे समन्स देत पालकांचे ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.