शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तच्या कामात ठेकेदाराकडून फसवणूक

By admin | Updated: July 7, 2016 00:36 IST

कृषी खात्याचे कानावर हात : मालक उपोषणाच्या तयारीत

नाशिक : जलयुक्त शिवार अभियानात पाणी अडवून जिरविण्यावर भर देण्याऐवजी या अभियानाची मुख्य जबाबदारी असलेल्या कृषी खात्याने ठेकेदाराला हाताशी धरून या योजनेतही भ्रष्टाचार करून पैसे अडवा, पैसे जिरवा हा कित्ता कायम ठेवला असल्याचे उघडकीस आले आहे. जमीन सपाटीकरणाचे काम ठेकेदाराला दिलेल्या कृषी खात्याने सपाटीकरणाचे काम करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांच्या तोंडाला पाने पुसून ठेकेदाराचे चांगभलं केल्याने ट्रॅक्टर मालक उपोषणाच्या तयारीत आले आहेत. सुरगाणा तालुक्यातील आमदा बाऱ्हे व कहांडोळसा या गावांमध्ये हा प्रकार घडला असून, यासंदर्भात ट्रॅक्टर मालकांनी आवाज उठविल्यानंतर ठेकेदार व कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करण्यास सुरुवात केली आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत या दोन्ही गावांमध्ये जमीन सपाटीकरणाचे काम कृषी खात्याने किरण अहिरे या ठेकेदाराला दिले. ठेकेदाराने तालुक्यातीलच काही ट्रॅक्टर मालकांकडून काम करून घेताना जितके काम होईल त्या प्रमाणात पैसे देण्याचे कबूल केले होती. साधारणत: एप्रिल महिन्यात पंधरा दिवसांत हे काम पूर्ण झाल्यावर या कामाचे मोजमाप कृषी सहायक संतोष फापाळे यांनी केले व त्यानुसार शासनाने या कामाचे ३ लाख ८१ हजार रुपये मंजूरही केले. मात्र त्यानंतर ठेकेदाराने ट्रॅक्टर चालकांना फक्त १६६ रुपये रोज याप्रमाणे पैसे देण्याचा प्रयत्न केला व उर्वरित रक्कम खिशात घातल्याची तक्रार या ट्रॅक्टर मालकांनी केली आहे. ठेकेदार अहिरे याने या साऱ्या प्रकाराबाबत कृषी सहायक फापाळे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करताना शंभर टक्के काम पूर्ण झालेले असताना त्यांनी ५० टक्केच काम झाल्याचे नमूद केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे म्हटले आहे, तर फापाळे यांनी शंभर टक्के काम पूर्ण होऊन पैसेही मंजूर झाल्याचे सांगितले आहे. सलग पंधरा दिवस काम करूनही हातात जेमतेम रक्कम पडत असल्याचे पाहून ट्रॅक्टर मालकांनी तालुका कृषी अधिकारी डंबाळे यांची भेट घेतली असता, त्यांनी यात आपला काहीच संबंध नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत. (प्रतिनिधी)