शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

बोट क्लबच्या निविदांवर चौथ्यांदा फुली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:36 IST

गंगापूर येथील बोट क्लब चालविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदा भरण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) अंतिम मुदत असताना तत्पूर्वीच त्यावर प्रशासनाने फुली मारली आणि बोट क्लब तसेच येथील रिसोर्ट चालविण्याचे काम एकाच ठेकेदाराला देण्याच्या नावाखाली सोमवारी (दि. २९) सायंकाळी निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

नाशिक : गंगापूर येथील बोट क्लब चालविण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या निविदा भरण्यासाठी मंगळवारी (दि. ३०) अंतिम मुदत असताना तत्पूर्वीच त्यावर प्रशासनाने फुली मारली आणि बोट क्लब तसेच येथील रिसोर्ट चालविण्याचे काम एकाच ठेकेदाराला देण्याच्या नावाखाली सोमवारी (दि. २९) सायंकाळी निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.  २०१२ मध्ये बोट क्लब झाल्यानंतर आतापर्यंत चारवेळा अशाप्रकारच्या निविदा रद्द करण्यामागे केवळ एका विशिष्ट ठेकेदाराची प्रेरणा कारणीभूत असून, त्याला काम मिळत नसल्याने वेळोवेळी विविध कारणे दाखवून निविदा रद्द करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.  नाशिकमध्ये गंगापूर येथे नयनरम्य ठिकाणी पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी बोट क्लब साकारण्यात आले आहे; मात्र विशिष्ट संस्थेसाठी त्यावर निविदा नाकारून त्या रद्द करण्यात येतात. यंदाही २ आॅक्टोबर रोजी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची मुदत मंगळवारी संपणार असताना महामंडळाने रिसोर्ट आणि बोट क्लब चालविण्याचे काम एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय झाल्याने ही निविदा रद्द करीत असल्याचे तोंडी सांगितले. वास्तविक, रिसोर्ट आणि बोट क्लब चालविणे या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. दोन्ही कामांची वैशिष्ट्ये वेगळी आहेत; मात्र असे असताना महामंडळ जाणीवपूर्वक घोळ घालत असल्याचा आरोप होत आहे. बोट क्लब चालविण्याचा ठेका निश्चित झाला असता तर नाशिककरांना ही दिवाळी भेट ठरू शकली असती; मात्र महामंडळाच्या घोळामुळे ते शक्य होणार नाही.प्रकल्प वाया जाण्याची शक्यतागंगापूर धरणावर सध्या ४८ बोटी असून, उर्वरित मोठ्या बोटी पर्यटनमंत्री जयकुमार रावळ यांच्या सूचनेनुसार येथून नेण्यात आल्या त्या परत आल्याच नाहीत. सध्याच्या ४८ बोटींचे आयुर्मान संपण्याच्या मार्गावर असून, त्यामुळे मोठा प्रकल्प वाया जाण्याची शक्यता आहे.४बोट क्लब चालविण्याचा ठेका निश्चित झाला असता तर नाशिककरांना ही दिवाळी भेट ठरू शकली असती; मात्र महामंडळाच्या घोळामुळे ते शक्य होणार नाही.

टॅग्स :boat clubबोट क्लबgangapur damगंगापूर धरण