शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

आइस्क्रीमचे आमिष दाखवून चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

By admin | Updated: May 11, 2017 17:01 IST

आइस्क्रीमचे आमिष दाखवून एका चार वर्षीय बालिकेवर फरसाण व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची निंदणीय घटना

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 11 : आइस्क्रीमचे आमिष दाखवून एका चार वर्षीय बालिकेवर फरसाण व्यापाऱ्याने बलात्कार केल्याची निंदणीय घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर शहरातील नाशिकरोड पोलीस ठाण्यावर महिलांनी मोर्चा काढून नराधमाला कठोर शासन करण्याची मागणी केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील सिन्नरफाटा भागात राहणारा व्यापारी संशयित सुभाष प्रकाशचंद्र झवर (५१) याने शेजारील एका बालिकेला घरात बोलावून आइस्क्रीमचे आमिष दाखविले. घराचा दरवाजा बंद करून घेत तिचे लैंगिक शोषण करीत अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित झवर यास अटक केली असून त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर बालिक ा अस्वस्थ झाल्यानंतर रडत-रडत घरात आली असता आईने विचारपूस केली तेव्हा सदर प्रकार त्यांच्या लक्षात आला. विशेष म्हणजे या नराधमाने त्या बालिकेला आइस्क्रिम देण्याचा बहाणा करून स्वत:च्या घरी आणले. बुधवारी रात्रीच्या सुमारास त्याने बालिकेच्या शरीरावर विविध भागांचा चावा घेतला व लैंगिक अत्याचार करून गुप्तांगही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नराधम झवरविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.संतापाचा उद्रेक - नाशिकरोड पोलिसांनी संशयित नराधम झवर यास अटक करून वैद्यकिय तपासणीसाठी बिटको रुग्णालयात आणले असता तेथे जमलेल्या शेकडो महिलांनी घोषणाबाजी करत नराधमाचा निषेध केला आणि सरकारने त्यास फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहरातील विविध माहिला संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून संशयित झवरविरूध्द कठोर कारवाईची मागणी केली आहे.