शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहन खरेदीचे ‘तीन-तेरा’ : मुदतीत एकही प्रस्ताव नाही

By admin | Updated: March 16, 2017 22:33 IST

जिल्हा परिषदेच्या अंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत बेरोजगार युवकांसाठी महत्त्वपूर्ण असलेली चारचाकी वाहन खरेदी योजना चालू आर्थिक वर्षात बारगळण्याची चिन्हे आहेत.

गणेश धुरीनाशिक : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत समाजकल्याण विभागामार्फत बेरोजगार युवकांसाठी महत्त्वपूर्ण असलेली चारचाकी वाहन खरेदी योजना चालू आर्थिक वर्षात बारगळण्याची चिन्हे आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या १५ मार्चच्या मुदतीत एकही तालुक्याचा वाहन खरेदीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त नसल्याचे वृत्त आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत चालू आर्थिक वर्षात चारचाकी वाहन खरेदीची योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेसाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात सुमारे दोन कोटींची तरतूद धरण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यासाठी सुमारे सहा ते सात लाभार्थ्यांना वाहन खरेदीचा लाभ देण्यात येणार होता. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्रावर आधी १ लाख ९८ हजार रुपयांची चारचाकी वाहन खरेदी करून त्यापोटी १० टक्के रक्कम अर्थात २० हजार रुपये लाभार्थ्याने संबंधित वाहन निर्मिती कंपनीकडे भरावयाची आहेत. इतकेच नव्हे तर खरेदी केलेल्या चारचाकी वाहनाचा विमाही लाभार्थ्यानेच भरावयाचा आहे. तसेच संपूर्ण १ लाख ९८ हजार रुपयांची चारचाकी वाहन खरेदी करून त्या खरेदीच्या पावत्या संबंधित तालुका पंचायत समितीकडे जमा करावयाच्या आहेत. तसेच त्या लाभार्थ्यांचे बॅँक खाते, आधार कार्ड क्रमांकही वाहन खरेदी पावतीसोबत जोडावयाचा आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून आचारसंहितेपूर्वीच प्रस्ताव प्राप्त होऊन ११० लाभार्थ्यांच्या चारचाकी वाहन खरेदीला मंजुरी देण्यात आलेली आहे. मात्र मार्च सुरू होऊनही एकही पंचायत समितीकडून चारचाकी वाहन खरेदीचे पावतीसह प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाला प्राप्त झालेले नाहीत. शिवाय काही दिवसांपूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना १५ मार्चच्या आत सर्व तालुक्यांचे चारचाकी वाहन खरेदीचे प्रस्ताव पाठविण्याची मुदत संपूनही अद्याप एकाही तालुक्याकडून चारचाकी वाहन खरेदीचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे या योजनेचा निधी आता पुढील आर्थिक वर्षात वापरण्याची वेळ समाजकल्याण विभागावर येण्याची शक्यता आहे. नवीन आर्थिक वर्षात त्यासाठी समाजकल्याण विभागाला सर्वसाधारण सभेत ही योजना राबविण्यास मंजुरी घ्यावी लागेल.