शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्यातील चौघे संशयित गजाआड

By admin | Updated: February 17, 2017 00:36 IST

दोघे नेपाळचे : प्रवासी रिक्षा पळवून नेऊन दरोडा

नाशिक : रिक्षाचालकास प्रवासी असल्याचे सांगून आडमार्गाला नेऊन मारहाण केल्यानंतर सदर रिक्षा पळवून नेत शहरातील विविध ठिकाणी दरोडा, जबरी लूट, तसेच मारहाण करणाऱ्या चौघा संशयितांना इंदिरानगर पोलिसांनी बुधवारी (दि़१५) रात्री अटक केली़ या संशयितांमध्ये नेपाळचे दोघे, तर जळगाव व नाशिकमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे़ दरम्यान, या चौघांनी ५ फेब्रुवारीला रात्री दहा ते साडेदहा या अवघ्या अर्धा तासात तिघांना जबर मारहाण तसेच धारदार शस्त्राने वार करून लुटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़इंदिरानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये कुंदन सोमनाथ खैरनार ऊर्फ कुंद्या (१९, रामवाडी), समाधान शांताराम ऊर्फ सीताराम पाटील (२८, रा़ अष्टगंध सोसायटी, जुईनगर, पेठरोड), रमेश मानबहादूर थापा (१९, पंचवटी, मूळ रा़ नेपाळ) व टिकाराम बहादूर डांगी (१९, रा़ विडी कामगारनगर, क. का.वाघ कॉलेजच्या पाठीमागे, आडगाव़, मूळ रा़ नेपाळ) या चौघांचा समावेश आहे़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५ फेब्रुवारी २०१७ रोजी रात्रीच्या सुमारास अमोल परदेशी (रा़ शिंगवे बहुला, देवळाली कॅम्प) या रिक्षा (एमएच १५, झेड ९२०६) चालकास या चौघा संशयितांनी जयशंकर लॉन्स येथे जायचे आहे, असे सांगितले़ तिथे पोहोचल्यानंतर त्यास प्रवासभाडे न देता बेदम मारहाण करून त्याच्याजवळील ५१० रुपये व रिक्षा पळवून नेली़ यानंतर ही रिक्षा घेऊन संशयित वडाळा गावातील मदार लॉन्स परिसरात गेले़ या ठिकाणी नाजिर अन्सारी या युवकास जबर मारहाण व पाठीवर कुकरीने वार करून जबर जखमी केल्यानंतर दोन हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला़ या चौघा संशयितांनी यानंतर रिक्षा इंदिरानगरच्या मेट्रो झोन गेटसमोरील अंधारात लावून रस्त्याने जात असलेले संकेत निमसे यांना कोयत्याचा धाक दाखवून अडविले़ त्यांच्याकडील मोबाइल व खिशातील पाकिट काढत असताना अचानक निमसे यांचा भाऊ तिथे आल्याचे पाहून निमसे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून रिक्षातून पळून गेले होते. (प्रतिनिधी)