शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

चार विद्यार्थी परीक्षेला मुकले

By admin | Updated: May 12, 2017 02:09 IST

नाशिक : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र बनावट केल्यामुळे चार विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बारावीनंतर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र बनावट तयार केल्यामुळे घोटीच्या चार विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारींची खातरजमा केल्यानंतर सायबर कॅफेचालकाकडूनच विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. नितीन मनोज विसपुते, समाधान संतोष वाजे, रक्षा विलास शिंदे, योगेश संपत पोरजे अशा या चार विद्यार्थ्यांची नावे असून, चौघेही घोटी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सीईटी परीक्षेचा अर्ज आॅनलाइन पद्धतीने गावातीलच सायबर कॅफेमधून दाखल केला होता. त्यांचा अर्ज तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्वीकारलाही गेला, परंतु परीक्षेचे शुल्कासाठी चलन भरून त्याची माहिती सादर करताना सायबर कॅफेचालकाने काहीतरी तांत्रिक चूक केल्यामुळे या चौघा विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र तयार होऊ शकले नाही. तथापि, सायबर कॅफेचालकाने बनावट प्रवेशपत्र बनवून दिले. गुरुवारी यातील नितीन विसपुते व समाधान वाजे हे दोघे के. के. वाघ पॉलिटेक्निक महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेले तर रक्षा शिंदे ही के. के. वाघ अ‍ॅग्रीकल्चर महाविद्यालयात व योगेश पोरजे हा एचटीपी महाविद्यालयात परीक्षा प्रवेशपत्र घेऊन गेले असता परीक्षा हॉलमध्ये त्यांच्या जागेवर अन्य दुसरेच विद्यार्थी बसलेले पाहून या चौघा विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थापकांना विचारणा केली. परीक्षेची वेळ झाल्यामुळे या चौघा विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरच्या परीक्षेसाठी बसू देण्यात आले. या दरम्यानच्या काळात प्रशासनाने तंत्रशिक्षण संचालनालयाशी संपर्क साधून खात्री केली असता, या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. चौकशीअंती सारी चूक सायबर कॅफेचालकाची असल्याचे उघड झाले.