शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

जागा चार, सत्तावीस दावेदार...

By admin | Updated: February 15, 2017 00:02 IST

जागा चार, सत्तावीस दावेदार...

नरेंद्र दंडगव्हाळ : सिडकोसंमिश्र लोकवस्ती व राजकीय परिस्थिती असलेल्या सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ मध्ये चार जागांसाठी २७ उमेदवार नशीब अजमावित आहेत. त्यात काका-पुतण्याचा आमने-सामने सामना रंगणार असल्याने येथील लढत चुरशीची झाली आहे. ‘अ’ अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गटातून सेनेचे विद्यमान नगरसेवक उत्तम दोंदे, भाजपाकडून राकेश दोंदे, राष्ट्रवादीचे प्रकाश (संदीप) वानखेडे, मनसेकडून प्रशांत खरात, बहुजन समाज पक्षाकडून किरण मोहिते, अपक्ष म्हणून राहुल भुजबळ, मनोज दोंदे, संदीप दोंदे, नंदकुमार कर्डक हे नशीब आजमावित आहेत. या गटातच विद्यमान नगरसेवक उत्तम दोंदे व पुतणे राकेश दोंदे हे दोघही आमने-सामने उभे ठाकले आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेवर असूनही सध्या सेना-भाजपा ज्याप्रमाणे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत, त्याच धर्तीवर या गटात एकाच घरात दोघा दोंदे यांच्यात होणाऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  ‘ब’ अनुसूचित जमाती गटातून सेनेकडून चंद्रकांत खाडे, राष्ट्रवादीकडून अमोल कोथे, भाजपाकडून लता मोतीराम पवार, मनसेचे लक्ष्मण वाघ व अपक्ष म्हणून किरण राजवाडे हे पाच उमेदवार एकमेकांसमोर ठाकले आहेत. चंद्रकात खाडे हे भारतीय वन सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी आहेत, त्याच बळावर त्यांची उमेदवारी आहे. या गटातील सर्वच उमेदवार नवखे असल्यामुळे मतदारही संभ्रमात आहेत.  ‘क’ नागरिकांचा मागास प्रवर्ग या गटातून शिवसेनेकडून माजी नगरसेवक पुंजाराम गामणे यांची कन्या किरण गामणे (दराडे), भाजपाकडून सोनल शेखर निकुंभ, मनसेकडून संगीता रामदास दातीर, कॉँग्रेसकडून वंदना पाटील, अपक्ष म्हणून सुवर्णा किरण सोनवणे, संध्या नारायण आहेर यांच्यात लढत होणार आहे. सेनेच्या किरण गामणे व भाजपाच्या सोनल निकुंभ व मनसेच्या संगीता दातीर ह्या तिघेही स्वकर्तृत्वापेक्षा कुटुंबातील राजकीय वारशांच्या बळावर उमेदवारी करीत असल्यामुळे एकप्रकारे त्यांच्या कुटुंबीयांचीच प्रतिष्ठापणाला लागली आहे. ‘ड’ सर्वसाधारण महिला गटातून सेनेच्या विद्यमान नगरसेवक शोभा तानाजी फडोळ, कॉँग्रेसकडून संगीता धोंडीराम आव्हाड, मनसेकडून बेबी संजय दातीर, भाजपाकडून कावेरी घुगे, भारतीय संग्राम परिषदेकडून शीतल साहेबराव दातीर, भारिप बहुजन महासंघाकडून मंदाबाई महादू सोनवणे हे उमेदवारी करीत आहेत. सेनेच्या नगरसेवक शोभा फडोळ यांच्याविरुद्ध सर्वपक्षीय उमेदवार असे चित्र असून, गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या संगीता आव्हाड यांनी फडोळ यांना आव्हान दिले होते, आता यंदा पुन्हा तशीच लढत होत आहे.