शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चार लाख रोपांची लागवड

By admin | Updated: July 2, 2017 00:15 IST

वनविभाग : संततधारेत वनमहोत्सवाला दमदार सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वन मंत्रालयाक डून राज्यस्तरावर चार कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट चालू आठवड्यात वनमहोत्सवाद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्णात वनविभागाच्या वतीने सुमारे चार लाख ६९ हजार ८७६ रोपांची यशस्वीरीत्या लागवड शनिवारी (दि.१) करण्यात आल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.राज्यस्तरावर वनमहोत्सव लोकसहभागातून राबविला जात आहे. वनविभागासह सर्वच शासकीय, निमशासकीय तसेच सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे. शनिवारी या वनमहोत्सवाचा थाटामाटात शुभारंभ करण्यात आला. इगतपुरीजवळील बोरटेंभे या ठिकाणी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्यासह वनविभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. वनविभागाच्या पश्चिम भागाला सहा लाख अठरा हजार ९७५ रोपांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी २९ ठिकाणी पश्चिम विभागाकडून एक लाख २३ हजार ५४० रोपांची लागवड करण्यात आली. वनविभाग पूर्वच्या वतीने सहा लाख बारा हजार १५१ रोपांच्या उद्दिष्टांपैकी पहिल्या दिवशी ९४ हजार १०८ रोपे २९ ठिकाणांवर लावण्यात आली. मालेगाव वनविभागाच्या हद्दीत ४३ ठिकाणांवर नऊ लाख ५३ हजार रोपांच्या उद्दिष्टांपैकी शनिवारी एक लाख ४० हजार ७५१ रोपे लावली गेली. सामाजिक वनीकरण विभागाकडून एक लाख एक हजार रोपांच्या उद्दिष्टांपैकी २२ हजार ९५० रोपे लावली गेली, तर वनविकास महामंडळाने तीन लाख ५० हजार रोपे लागवडीच्या उद्दिष्टांपैकी ८८ हजार ३२७ रोपे ३८ ठिकाणांवर लावली. वन्यजीव विभागाने एका ठिकाणी २०० रोपांची लागवड केली. वनमहोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरासह जिल्ह्यात वनविभागाकडून सुमारे चार लाख ६९ हजार ८७६ रोपांची लागवड करण्यात आल्याचा दावा वन खात्याने केला आहे.भर पावसात एकत्र आले हजारो हातहरित भविष्यासाठी एक वृक्ष लावू व त्याचे संगोपन करू हे व्रत घेऊन वनमहोत्सवाच्या निमित्ताने जिल्हास्तरावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी एकत्र येत हजारो रोपांची लागवड केली. भर पावसात वृक्षारोपणासाठी शेकडो हात एकत्र आले होते. रेनकोट, छत्र्यांचा आधार घेत लागवड करण्यात आली. लावलेल्या लाखो रोपांचे संवर्धन झाल्यास जंगलाचे क्षेत्र वाढीस हातभार लागणार आहे.