शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मालेगावजवळ तिहेरी अपघातात चार ठार

By admin | Updated: June 30, 2017 01:04 IST

ंमालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पाटणे शिवारात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात धुळे येथील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कंमालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर पाटणे शिवारात झालेल्या भीषण तिहेरी अपघातात धुळे येथील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये मायलेक व दोघा सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुरुवारी ४ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. डॉ. प्राची चिंतन दवे (३१), मयूर चिंतन दवे (१० महिने), ऋची मयूर शाह (२७) सर्व रा. अग्रवालनगर, धुळे, चालक रफीक रसूल शेख (३५) ही अपघातातील मृतांची नावे आहेत, तर या अपघातात चिंतन दवे (३२) हे जखमी झाले आहेत. नाशिक येथून कामकाज आटोपून दवे कुटुंबीय धुळ्याकडे येत होते. तालुक्यातील पाटणे शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील गतिरोधकजवळ हा भीषण अपघात घडला. धुळ्याकडे जात असताना पाटणे फाट्यावर पुढे चालणाऱ्या कार (क्र. एमएच १८ व्ही ८८) हिच्यावर त्यांची कार (क्र. एमएच १८ एजे ०४३५) आदळण्याच्या प्रयत्नात होती. यावेळी कारचालक रफीक शेख यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुढील कारवर आदळू नये म्हणून त्यांनी ब्रेक मारला. यावेळी गाडी रस्त्यावरच उलटली. पाठीमागून येणाऱ्या कन्टेनरने त्यांच्या कारणे जोरदार आदळल्यामुळे स्विफ्ट कारमधील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला. प्राची व मयूर हे मायलेक तर प्राची व रुची या सख्ख्या बहिणी होत्या. रुग्णालयातील कामकाज आटोपल्यानंतर काळाने दवे कुटुंबीयांवर घाला घातला.