शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातचे चार साईभक्त अपघातात ठार काळाचा घाला:

By admin | Updated: June 14, 2015 01:51 IST

मध्यरात्री झाडावर कार आदळल्याने झाला अपघात

नाशिक : गुजरातमधील वापी शहरात राहणारे चौघे मित्र शिर्डी येथील साईबाबा यांच्या दर्शनासाठी निघाले असताना शनिवारी (दि.१३) मध्यरात्री पेठरोडवरील एका चिंचेच्या झाडावर त्यांची मोटार जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, मोटारीचा चक्काचूर झाला. या अपघातात मोटारीमधील चौघे तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुजरात येथून चौघे मित्र शिर्डी दर्शनासाठी वरना मोटारीने (जी.जे. १५ पीपी ६८१७) नाशिकमार्गे जात होते. दरम्यान, शहरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच पेठरोडवर या तरुण साईभक्तांवर काळाने घाला घातला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटार थेट रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या मोठ्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात पंकज भिकनभाई मोरे (२९), अतिक समद शेख (३०), जयकिशोर प्रभाकर (२७), विरल रमेश पटेल (२७) सर्व राहणार वापी यांचा मृत्यू झाला. पटेल यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला, तर उर्वरित तिघे जागीत ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, मोटारीची अपघातामुळे बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे गंभीर जखमी झालेले पटेल यांना बाहेर काढताना अडचणी निर्माण झाल्या. अखेर पोलिसांनी पंचवटी अग्निशामक दलाची मदत घेतली. जवानांनी घटनास्थळी पोहचत इलेक्ट्रिक कटर यंत्राने मोटारीचा दरवाजा कापून जखमींसह मयत तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. जखमी झालेले पटेल यांना तत्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविले, तर अन्य तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. मयत तरुणांपैकी शेख हे विवाहित होते.