शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनावर चार कोटींची उधळपट्टीआरोग्य समिती बैठक : चौकशीची मागणी

By admin | Updated: August 15, 2014 00:35 IST

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वेतनावर चार कोटींची उधळपट्टीआरोग्य समिती बैठक : चौकशीची मागणी

 नाशिक : राज्याच्या अपर आरोग्य सचिवांनी पत्र देऊनही जिल्हा परिषदेच्या पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांचा ब वर्ग असताना प्रत्यक्षात अ वर्गाचे वेतन देऊन वर्षाकाठी सुमारे एक कोटी असा चार वर्षांत चार कोटींचा शासनाचा बेकायदेशीर खर्च करण्यात आल्याने त्याची चौकशी व्हावी व यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत समिती सदस्यांनी केली.सभापती ज्योती बाळासाहेब माळी यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीच्या सुरुवातीलाच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्णातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत समाज कायापालट प्रकल्प (सीएसआर) राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. त्यात नाशिक तालुक्यातील शिंदे प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी निधीची उपलब्धता ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्थानिक पातळीवरील औद्योगिक वसाहतींतून २ टक्के समाजसेवा करातून वसूल करावी, असे शासनाचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे दूषित पाणीपुरवठा संदर्भात प्रयोगशाळेकडून पंधरा दिवसांनी अहवाल प्राप्त होतो. हा अहवाल वेळेत आला नाही, तर दूषित पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर येते. त्यामुळे हा अहवाल चार दिवसांत न आल्यास संबंधितांवर कारवाईची मागणी समिती सदस्यांनी केली. तसे पत्रच मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना देण्याची मागणी पंचायत समिती सभापती अनिल ढिकले यांनी केली. त्याचप्रमाणे जिल्ह्णातील पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा वर्ग ब असतानाही त्यांना अ वर्ग वेतनश्रेणी देण्यात आली. मुळात ही वेळेत श्रेणी लागू करण्याआधी संबंधित वेतन पथकाने त्याची पडताळणी केली होती काय? जर राज्याचे अपर सचिव टी. सी. बेंजामिन यांनी अशी वेतनश्रेणी लागू करण्यास या पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट विरोध कळविला होता. तर का लागू करण्यात आली, हे पाच वैद्यकीय अधिकारी या आदेशाविरोधात न्यायालयात गेले असतील तर न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली आहे काय, त्याची प्रत आरोग्य विभागाकडे आहे काय, या पाचही वैद्यकीय अधिकाऱ्यांवर अ वर्गाची जादा वेतनश्रेणी दिल्यामुळे जिल्हा परिषदेवर सुमारे एक कोटीचा बोजा पडत आहे. चार वर्षांत जिल्हा परिषदेवर चार कोटींचा बोजा पडला आहे. त्यास जबाबदार असलेल्या आरोग्य व लेखा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली. बैठकीस सदस्य डॉ. भारती पवार, मनीषा बोडके, शरद माळी आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)