शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

माजी आमदार मौलाना मुफ्ती यांचा एमआयएममध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2019 00:29 IST

मालेगाव मध्य : राष्टÑवादी कॉँग्रेसचे मालेगाव मध्य मतदार संघातील माजी आमदार मौलाना मुफ्ती मोह्ममद इस्माईल यांनी गुरुवारी रात्री आपल्या समर्थकांसह एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश घेतला.

ठळक मुद्देइम्तियाज जलील हे गुरुवारी सायंकाळी मालेगावात दाखल झाले होते.

मालेगाव मध्य : राष्टÑवादी कॉँग्रेसचे मालेगाव मध्य मतदार संघातील माजी आमदार मौलाना मुफ्ती मोह्ममद इस्माईल यांनी गुरुवारी रात्री आपल्या समर्थकांसह एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएम पक्षात प्रवेश घेतला.गेल्या काही दिवसांपासून मौलाना मुफ्ती हे एमआयएमच्या संपर्कात होते. बकरी ईदनंतर ते हज यात्रेसाठी गेल्याने त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता. दोन दिवसांपूर्वीच ते हजयात्रेहून परतताच त्यांनी तातडीने खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत एमआयएममध्ये प्रवेश घेतला. खासदार इम्तियाज जलील हे गुरुवारी सायंकाळी मालेगावात दाखल झाले होते. रात्री उशीरा मुशावरत चौकात झालेल्या सभेत मौलाना यांचा पक्षप्रवेश झाला. प्रथम जनसुराज्य पक्ष, नंतर राष्टÑवादी आणि आता एमआयएम असा मौलाना यांचा प्रवास आहे.मौलाना यांच्या प्रवेशाने मालेगाव मध्य मतदारसंघातील कॉँग्रेसचे आमदार आसिफ शेख यांच्याशी काट्याची लढत रंगण्याचे आता स्पष्ट झाले आहे.या नव्या राजकीय समीकरणांमुळे मतदार संघातील वंचित आघाडी व मोमीन मतदार यांच्या बळावर निवडणूकीत चुरस पहावयास मिळणार आहे. दरम्यान, मालेगाव मध्य मतदारसंघात खरी लढत दुरंगी होते की तिरंगी याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.देशात तीन तलाक, आसाममध्ये एनआरसीचा मुद्दा, व काश्मिरमधून कलम ३७० हटविण्याचा घेतलेला निर्णय यावरु नच देशात लोकशाही संपुष्टात आली असून देश हुकुमशाहीकडे वाटचाल करीत असल्याचे जाणवत आहे. या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय लाभ उचलण्यासाठी विभिन्न प्रकारे पक्षाला टिकेचे लक्ष्य करणारेच आज भाजपाच्या तंबूत सामील झाले आहेत. एमआयएममुळे राज्याचे राजकीय समीकरणे बदलणार असल्याने सर्व धर्मियांनी पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. - इम्तियाज जलील, खासदार