शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कोमेजला फुलांचा बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:35 IST

नाशिक : व्रतवैकल्यांच्या या काळात फुलांना मोठी मागणी असते. मात्र सध्या जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : व्रतवैकल्यांच्या या काळात फुलांना मोठी मागणी असते. मात्र सध्या जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे फुलांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे उत्पादक, विक्रेते, व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. फुलांचे भाव पुढे वाढतील, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. दमदार पाऊस, मोठ्या प्रमाणात झालेली लागवड यामुळे फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले असून, माल जास्त तर मागणी कमी त्यामुळे भाव पडले आहेत. फुलांच्या विक्रीतून खरेदीचा भावही निघत नसल्याने विक्रेते हवालदिल झाले आहेत. सध्या गुलाब, मोगरा, झेंडू या फुलांचे दर कमी झाले असून, श्रावण सुरू झाल्यानंतर कदाचित भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकला मखमलाबाद, दरी, मातोरी, गंगापूर, अहमदाबाद (नवसारी) येथून गुलाब, झेंडू, लिली अशी सर्वच प्रकारची फुले येतात. यंदा पाऊस चांगला होत असल्याने फुलांचे भरघोस पीक आले आहे. दीप अमावास्या, श्रावण यामुळे फुले, बेल, तुळशी, दुर्वा आदींची मागणी वाढणार आहे.असे आहेत फुलांचे तुलनात्मक बाजारभावफुलाचा प्रकारमागील वर्षीचे भाव आजचे भाव छोटा गुलाब गड्डा१० ते ३० रुपये२ ते ६ रुपये टाटा गुलाबचा गड्डा५० ते ७० रुपये१२ ते २० रुपये टॉप गुलाबचा गड्डा७० ते ८० रुपये२० ते २५ रुपये मोगरा६०० रुपये३०० ते ४०० रुपये मोगऱ्याचा गजरा१५ ते २५ रुपये प्रति१० ते १५ रुपये झेंडू३०० ते ४०० रुपये१०० ते २०० रुपये निशिगंधा२४० ते २५० रुपये१२० ते १६० रुपये लिली बंडल२० रुपये८ ते १० रुपये जास्वंदी१०० रुपये पावशेर५० ते ६० रुपये तुळस२०० रुपये किलो६० ते ७० रुपये दुर्वा२० रुपये जुडी५ रुपये जुडी