शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

फ्लेक्स प्रिंटिंगचा व्यवसाय तेजीत

By admin | Updated: February 15, 2017 00:43 IST

पोस्टरबाजी : विविध पक्षश्रेष्ठींच्या सभांची तयारी

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांकडून प्रचारासाठी मोठ-मोठे फ्लेक्स लावण्यात येत असून, फ्लेक्स प्रिंटिंग व्यावसायिकांकडे पक्षांच्या तसेच अपक्ष उमेदवारांनी लहान-मोठ्या आकारांचे फ्लेक्स तयार करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे प्रिंटिंग व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आला असून, नेहमीच्या तुलनेत प्रिंटिंग व्यवसायात निवडणुकीच्या कालावधीत ५५ ते ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रचार वाहनांवर लावण्यासाठी तसेच पक्षश्रेष्ठींच्या सभांच्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारे मोठे फ्लेक्स बनवून घेण्यासाठी विविध पक्षांच्या उमेदवार प्रतिनिधींची फ्लेक्स प्रिटिंग व्यावसायिकांकडे रीघ लागली आहे.  निवडणूक तोंडावर आली की, राजकीय नेतेमंडळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी फ्लेक्सचा वापर करतात. त्याचा फायदा फ्लेक्स व्यावसायिकांना होत असून, साधारण ८ ते १० रु पये प्रतिचौरस फूट खर्च येतो. साधा १० बाय १० च्या फ्लेक्ससाठी ३ हजार रु पयांपासून पुढे खर्च येतो; तसेच ४० बाय ८० फ्लेक्ससाठी किमान ४५ ते ५० हजार रु पये खर्च येतो. त्याचबरोबर फ्लेक्स लावण्यासाठी कामगारांना किमान ५ ते ७ रु पये चौरस फूट खर्च येतो. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी असे फ्लेक्स लावायचे असल्यास त्या ठिकाणांचे दरही जास्त असल्याचे व्यावसायिक सांगतात. आचारसंहितेच्या अगोदर विविध पक्षांच्या नेते मंडळींचे फ्लेक्सवॉर मोठ्या प्रमाणात सुरू होते. त्यांच्या फ्लेक्स वॉरमुळे तत्काळ फ्लेक्स तयार करून देणाऱ्या व्यावसायिकांना सुगीचे दिवस आले होते. आता निवडणूक रणधुमाळीच्या कालावधीत वेळेवर फ्लेक्स तयार करून मिळत असल्याने तसेच फ्लेक्सचे दर निश्चित करतानाही घासाघीस करावी लागत नसल्याने अनेक उमेदवारांनी पूर्वीच्याच व्यावसायिकांक डून काम करून घेणे पसंत केले आहे. त्याचबरोबर काही इच्छुकांनी लहान आकाराची पत्रकेही आचारसंहितेच्या अगोेदरपासूनच वाटप करण्याचा धडाका सुरू केला होता. त्यात आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका इच्छुकाकडून सुमारे ५० हजारांहून अधिक पत्रके छापण्यात येत असून, त्यामधून व्यावसायिकांना चांगलेच उत्पन्न मिळत आहे. एक पत्रक छापण्यासाठी ५ रुपये ते १५ रुपयांपर्यंत दर आहेत. पत्रकासाठी वापरण्यात येणाऱ्या कागदाच्या आणि रंगांच्या गुणवत्तेवर हे दर ठरत असून, काही अपक्ष उमेदवार झेरॉक्सवर काम चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)