प्रारंभी इंद्राई किल्ल्याचे व तिरंगा ध्वजाचे पूजन करून घोटीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश कडू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गिर्यारोहकांनी भारत माता की जय, स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, जय हिंदच्या घोषणांनी गड दुमदुमून गेला.
यावेळी कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा गिर्यारोहक टीमचे प्रमुख भगीरथ मराडे, बाळासाहेब आरोटे, अशोक हेमके, गजानन चव्हाण, प्रवीण भटाटे, काळू भोर, प्रशांत येवलेकर, बाळासाहेब वाजे, नीलेश पवार, सुरेश चव्हाण, लक्ष्मण जोशी, गोकुळ चव्हाण, उमेश दिवाकर, बालाजी तुंबारे, आदेश भगत, ज्ञानेश्वर मांडे, गोविंद चव्हाण, संतोष म्हसणे, सोमनाथ भगत, भगवान तोकडे, पुरुषोत्तम बोराडे, पांडू भोर, संदीप खैरनार, दीपक कडू, परमेश्वर गिते, देवीदास पाखरे आदी सहभागी झाले होते. (१८ घोटी २)
180821\18nsk_32_18082021_13.jpg
इंद्राई किल्ल्यावर तिरंग्याचे ध्वजारोहण