शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत पाच बळी

By admin | Updated: May 14, 2014 01:00 IST

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गासह घोटी शहराला जोडणार्‍या घोटी - सिन्नर व घोटी - वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे.

घोटी : मुंबई - आग्रा महामार्गासह घोटी शहराला जोडणार्‍या घोटी - सिन्नर व घोटी - वैतरणा रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरू आहे. गेल्या आठवड्याभरापासून दुचाकी व इतर वाहनाच्या अपघाताची मालिका कायम असून, गेली चार दिवसांपासून घोटी परिसरात झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले, तर पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई - आग्रा महामार्गावर गोंदे शिवारात लेहेर कारखान्याजवळ झालेल्या अपघातात आडवण येथील एका लष्करी जवानाचा मृत्यू झाला. यानंतर दुसर्‍या दिवशी घोटी वैतरणा रस्त्यावर वाकी शिवारात साहेबसिंग परदेशी या इसमाचा दुचाकीच्या अपघातात जागीच मृत्यू झाला. यानंतर दुसर्‍या दिवशी घोटी - सिन्नर रस्त्यावर धामणीजवळ एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात चालकासह दहा जण गंभीर जखमी झाले. तर दुसर्‍या दिवशी घोटीजवळ किनारा हॉटेलसमोर दुचाकीला बसने धडक दिल्याने तळेगाव येथील नानासाहेब रायकर हे जागीच ठार झाले, तर इतर दोघे जण जखमी झाले. या अपघाताला काही तास उलटताच तोच काल रात्रीच्या सुमारास त्याच ठिकाणी दुचाकीचा अपघात झाल्याने घोटीतील महेश ऊर्फ भावड्या जुंदरे या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला. दरम्यान, महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढत असताना रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणार्‍या कंपनीकडून अपघात रोखण्यास उपाययोजना करण्यात सपशेल अपयश येत आहे. महामार्गाबरोबर कसारा घाटातही अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. महामार्गावरील तुटलेल्या संरक्षक भिंती, नष्ट झालेले गतिरोधक, वळण रस्त्यावरील वाढलेली झाडे, प्रचंड उतार, गायब झालेले दिशादर्शक फलक कारणीभूत ठरत असताना या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे.