शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पाच संशयितांची कारागृहात रवानगी

By admin | Updated: October 15, 2016 01:54 IST

पाडळी फाटा : वकिलासह चार विद्यार्थ्यांचा समावेश

 नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पाडळी फाटा येथील दंगलप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांनी रविवारी (दि़ ९) संशयित म्हणून एका वकिलासह, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील चार विद्यार्थ्यांना अटक केली होती़ तर एका वकिलास रबरी बुलेट लागल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे़ पोलिसांनी अटक केलेल्या या पाचही संशयितांची न्यायालयाने मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली असून, उर्वरित आणखी चार संशयित वकिलांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे़इगतपुरी तालुक्यातील अ‍ॅड़ पंढरीनाथ भिकाजी गायकर (३२, रा. खैरगाव, ता़ इगतपुरी),अ‍ॅड हनुमान देवराम मराडे (३०, मु़ पो़ वाकी, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), अ‍ॅड़ सुनील विलास काळे (३१, मु़ पो़ घोटी, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), अ‍ॅड़ सुनील निवृत्ती कोरडे (३१, मु़ पो़ गिरणारे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), अ‍ॅड़ सुशील शिवाजी गायकर (३०, मु़ पो़ वाघेरे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक ) व अ‍ॅड़ भारत पंढरीनाथ कोकणे (मु़ पो़ कोरपगाव, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) हे वणी व सापुतारा येथे फिरण्यासाठी गेले होते़ वणीहून घरी परतत असताना महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे त्यांनी गाडी घोटीच्या दिशेने वळविली़ पाडळी फाट्यावर हे सर्व जण पोहोचले अन् त्याचवेळी तेथील जमावाने दगडफेक तर पोलिसांनी रबरी गोळीबार सुरू केला़ या प्रकारामुळे घाबरलेल्या वकिलांनी गाडीतून पळ काढला असता अ‍ॅड़ पंढरीनाथ गायकर यांच्या पाठीस एक गोळी लागल्याने ते जखमी झाले, तर उर्वरित पाच जणांपैकी अ‍ॅड़ भारत कोकणे व सहलीसाठी गेलेले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी समाधान मोहन वारुंगसे (२०, मु़ पो़ गोंदे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), विष्णू ज्ञानेश्वर उगले (२१, रा़ समनेरे, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), प्रकाश गंगाधर चौधरी (२२, रा़ पाडळी देशमुख, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक), नामदेव तुकाराम शिंदे (२०, रा़ दवडत, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) यांना अटक केली होती़ (प्रतिनिधी)