शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पाच खासगी बसेस जळून खाक

By admin | Updated: April 22, 2016 01:27 IST

औरंगाबाद रोडवरील प्रकार : मध्यरात्रीची घटना; नागरिकांत घबराट

 नाशिक : औरंगाबाद रोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमासमोर असलेल्या एचएएलच्या मोकळ्या वाहनतळावर उभ्या केल्या जाणाऱ्या खासगी बसेसला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास पाच बसेस जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बसेसना आग लागल्याची घटना कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत सव्वा तासात आग आटोक्यात आणली. या घटनेबाबत आडगाव पोलिसांत अकस्मात जळीतची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, औरंगाबाद रोडवरील संत जनार्दन स्वामी आश्रमासमोर असलेल्या मोकळ्या पटांगणात एचएएल कंपनी कामगारांना सोडण्यासाठी खासगी बसचे कॉन्ट्रॅक्ट असून, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमाराला नेहमीप्रमाणे बसेस उभ्या असताना मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास अचानक एका बसने पेट घेतल्याचे सुरक्षारक्षक उत्तम वीर यांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच अन्य उभ्या असलेल्या बसेसने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. वीर यांनी तत्काळ अग्निशमन दल व पोलिसांना माहिती कळविली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान बंबांसह दाखल झाले. त्यांनी एक ते दीड तासांत शर्थींचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. रात्रीच्या वेळी आग लागल्याची घटना घडल्याने या बस कोणी पेटविल्या की तांत्रिक बिघाडामुळे त्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झाली नाही. या घटनेत एमएच १५, एके १११५, एमएच १५, एफइ ८०१, एमएच १५, एफइ ४५०, एमएच १५, एफइ ४५९, एमएच १५, एफइ ५४९ या पाच बसेस जळून खाक झाल्या आहेत. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)