शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पदव्युत्तर वैद्यकीयच्या पाचशे जागा राज्यासाठीच

By admin | Updated: May 13, 2017 00:42 IST

नाशिक : पदव्युत्तर आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पाचशे जागांवर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे,

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पुढील वर्षापासून पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय शिक्षणक्रमांसाठी राज्यातील विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पाचशे जागांवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी ही माहिती दिली. राज्य शासनाने खासगी आणि अभिमत संस्थांमध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ६७.५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात काही पालकांनी सर्वाेच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे न्यायालयाने राज्य शासनाच्या निर्णयाला स्थगिती देत प्रवेश प्रक्रिया सुरू असताना अशाप्रकारचा निर्णय घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यामुळे राज्य शासनाची अडचण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्य शासन पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय उच्च शिक्षणाची संधी कशी मिळेल या दृष्टीने राज्य शासन रणनीती ठरवित असल्याची माहिती महाजन यांनी दिली. गेल्यावेळी हे शक्य झाले नसले तरी पुढील वर्षी कायदा करूनच महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना न्याय देऊ, परप्रांतीय विद्यार्थ्यांना प्रवेशच दिला जाणार नसल्याने सुमारे पाचशे जागा राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाटेला येतील, असे ते म्हणाले. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. राज्य शासनाचीदेखील हीच भूमिका होती. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यापूर्वी निर्णय घेतला होता. परंतु त्यात अडचणी निर्माण झाल्याने पुढील वर्षापासून कायदेशीररीत्या मार्ग काढला जाणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.