शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

By admin | Updated: April 24, 2016 00:35 IST

बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

निफाड : तालुक्यातील कुरडगाव येथे शुक्र वारी रात्री बिबट्याने हल्ला करत तब्बल पाच शेळ्या ठार झाल्याची घटना घडली.निफाड - कुरडगाव रस्त्यावर रतन एकनाथ चकोर यांचे शेत असून, सालकरी भाऊराव विश्वनाथ माळी शेतातील खोलीत राहतो. माळी यांच्या एकूण पाच मोठ्या शेळ्या घराबाहेर दररोज बांधलेल्या असतात. दररोज रात्री माळी कुटुंबीय घराबाहेर शेळ्यांच्या बाजूला झोपतात. शुक्रवारी रात्री ११ पर्यंत माळी कुटुंबीय घराबाहेर बसलेले होते. शुक्रवारी माळी कुटुंब रात्री ११ नंतर घरात झोपले आणि बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करत पाच शेळ्या ठार केल्या. माळी उठल्यानंतर घराबाहेर तीन शेळ्या मृतावस्तेत आढळल्या. माळी यांच्या एकूण पाच शेळ्यांपैकी तीन शेळ्यांवर बिबट्यांनी हल्ला करून ठार केले व त्यांना ओढून नेण्याचा प्रयत्न केला; मात्र शेळ्या बांधलेल्या असल्याने बिबट्यांनी इतर दोन शेळ्याकडे आपला मोर्चा वळवत त्यांना ठार करून ओढत पश्चिम बाजूला काही अंतरावर असलेल्या उसात नेले. ओढून नेल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. सदर घटना येवला वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनरक्षक विजय टेकनर आणि वनकर्मचारी दिलीप अहिरे तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. यापूर्वीही बिबट्याने निफाड-कुरडगाव रस्त्यावर बोडके आणि सांगळे वस्तीजवळ काही दिवसाच्या अंतराने दोन मोटरसायकलचा पाठलाग करून मोटारसायकलस्वार दोन महिलांना जबर जखमी केले होते. (वार्ताहर)