शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या खजिन्यात दीड दिवसात साडेपाच कोटी

By admin | Updated: November 12, 2016 02:23 IST

करवसुली : भरणा करण्यासाठी लागल्या रांगा

नाशिक : नाशिक महानगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीसह विविध कर वसुलीसाठी पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारण्यास सुरुवात केल्याने शुक्रवारी (दि. ११) सायंकाळपर्यंत महापालिकेच्या खजिन्यात सुमारे पाच कोटी ५८ लाख रुपयांची वसुली झाली. मध्यरात्रीपर्यंत बिलिंग काउंटर खुले ठेवले जाणार असल्याने वसुलीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कर भरणा करण्यासाठी नागरिकांच्या बिलिंग सेंटरवर रांगा लागल्या होत्या.राज्य शासनाने महापालिकेला घरपट्टी-पाणीपट्टीसह विविध कर वसुलीसाठी पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने गुरुवारी दुपारी २ वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बिलिंग काउंटर सुरू ठेवले. या दहा तासांमध्ये महापालिकेच्या खजिन्यात घरपट्टीच्या माध्यमातून ६१ लाख २३ हजार रुपये तर पाणीपट्टीच्या माध्यमातून चार लाख ८४ हजार रुपये जमा झाले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासूनच महापालिकेने बिलिंग काउंटर सुरू केले. महापालिकेच्या सहाही विभागांतील केंद्रांसह एकूण १८ ठिकाणी बिलिंग सेंटरची व्यवस्था आहे. सर्व ठिकाणी महापालिकेने अतिरिक्त काउंटर देत करदात्यांना सुविधा उपलब्ध करून दिली. सर्वच केंद्रांवर महापालिकेने वसुलीसाठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्याही नेमणुका केल्या आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन कोटी ६७ लाख घरपट्टी तर ६३ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली होती. याशिवाय, विविध कर आणि नगररचना विभागाच्या माध्यमातून आकारले जाणार कर मिळून महापालिकेच्या खजिन्यात दीड दिवसात सुमारे साडेपाच कोटी रुपये जमा झाल्याची माहिती कर विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी दिली.