शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनतर्फे सैन्य दलाला पाच रुग्णवाहिकांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST

नाशिक : जम्मू काश्मीरमधील अनाथ मुलींचे शिक्षण, संगोपन करण्यासह काश्मीर खोऱ्यात सीमारेषेवरील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबिरे घेत धडपड ...

नाशिक : जम्मू काश्मीरमधील अनाथ मुलींचे शिक्षण, संगोपन करण्यासह काश्मीर खोऱ्यात सीमारेषेवरील नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत आरोग्य शिबिरे घेत धडपड करणाऱ्या बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन या संस्थेने नुकत्याच जम्मू आणि काश्मीरमधील भारतीय सैन्यदलाला पाच अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट दिल्या.

दिल्ली येथे भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी हिरवा झेंडा दाखवीत उद्घाटन केले. बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनचे संस्थापक आणि काश्मीरवासीयांसाठी जिवाचे रान करणारे अधिक कदम यांच्या प्रयत्नांतून या रुग्णवाहिका देण्यात आल्या. या सर्व रुग्णवाहिका भारतीय सैन्य दलाच्या निगराणीत असतील. कुपवाडा, बारामुल्ला जिल्ह्यांतील ग्रेस, माटील, केरन, तंगधार, उरी अशा विविध ठिकाणी या रुग्णवाहिका पोहोचविल्या जाणार आहेत. उद्घाटनप्रसंगी दिल्ली भाजपचे उपाध्यक्ष वीरेंद्र सचदेव, तसेच राज्यसभा सदस्य खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्यासह बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशनचे संस्थापक अधिक कदम, कोटक महिंद्रा बँकेचे सचिव राघवेंद्र सिंह,भाजपा नेते सियाम जाजू,राजीव कोरी,डॉ.वीरेंद्र, मोहन गिरी, नरसिंह लगड, आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वीदेखील या संस्थेच्यावतीने नागपूर येथून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते काश्मीर खोऱ्यात तीन अत्याधुनिक रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहेत. बीएसएफ जवानांनादेखील काही रुग्णवाहिका बॉर्डरलेस वर्ल्ड फौंडेशन या सेवाभावी संस्थेने याआधी दिलेल्या आहेत. यावेळी संस्थापक अधिक कदम यांच्यासमवेत नाशिकचे ऋषिकेश परमार आणि जळगाव येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो

२२ॲम्ब्युलन्स