शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

पहिले भरती, मग खुर्ची

By admin | Updated: May 25, 2014 20:36 IST

स्वच्छतेप्रश्नी सतर्कता : सिडकोच्या सभापतींनी पुकारला एल्गार

स्वच्छतेप्रश्नी सतर्कता : सिडकोच्या सभापतींनी पुकारला एल्गारसिडको : सात खेडी तसेच दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या सिडको प्रभागात आरोग्य विभागात कामकाज करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत कमी आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न कायम निर्माण होत असून, मनपा आयुक्तांनी सदरची बाब गांभीर्याने घ्यावी यासाठी नवनियुक्त सिडको प्रभाग सभापती उत्तम दोंदे यांनी सभापती कार्यालयातील खुर्चीवर न बसता काम करण्याचे अनोखे आंदोलन आजपासून सुरू केले आहे. याबाबत आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.सिडको विभागात एकूण ११ प्रभाग आहेत. तसेच सिडको ही अत्यंत दाट लोकसंख्या असलेली वसाहत आहे. याबरोबरच सात खेडी आहे. तसेच पाथर्डी, चुंचाळे, कामटवाडे, उंटवाडी या परिसराचाही समावेश आहे. या भागात लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत असून, आरोग्याच्या प्रश्नावर सर्वच नगरसेवकांकडून अधिकार्‍यांवर नाराजी व्यक्त केली जाते. कर्मचारी संख्या कमी असल्याने आरोग्य विभागाकडून संपूर्ण परिसराची साफसफाई होत नाही, तसेच ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. लोकसंख्येच्या आधारावर जर कर्मचारी संख्या बघितली, तर सिडको विभागाच्या सफाई कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत कमी असल्याचे दिसून येते.आरोग्य विभागामध्ये एक हजार लोकसंख्येला तीन कर्मचारी, तर तीन लाख लोकसंख्येला ९०० कर्मचारी आवश्यक आहेत; परंतु सिडको विभागात ११ प्रभागांसाठी केवळ ११७ सफाई कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यामध्ये १० ते १५ कर्मचारी हे इतर विभागांत सोयीनुसार काम करीत असल्याचे प्रभाग सभापती उत्तम दोंदे यांनी सांगितले. मनपा आयुक्तांनी सफाई कर्मचार्‍यांबाबत समान नियोजन करून सिडको विभागात कर्मचारी संख्या वाढवावी अन्यथा खुर्चीवर न बसता कामकाज करण्याचा इशाराही सभापती दोंदे यांनी दिला आहे. (वार्ताहर)