शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आधी शोक, मग टाळ्या

By admin | Updated: August 12, 2014 01:47 IST

आधी शोक, मग टाळ्या

नाशिक : स्थानिक पातळीवर नगरसेवकांचे आप्तेष्ट तसेच राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील मान्यवर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली, तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली नाही. दुसरीकडे मात्र कॉँग्रेस गटनेत्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आणि बाके वाजवून अभिनंदन करण्यात आल्याने पालिकेच्या सभागृहाला खरोखरीच दु:ख झाले की नाही, असा प्रश्न निर्माण झाला.पालिकेची मासिक महासभा सोमवारी सकाळी महापौरांनी बोलावली होती. या महासभेत महिला व बालकल्याण समितीचे सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव होता. त्याचबरोबर अन्य नागरी विकासकामांचेही प्रस्ताव होते. तथापि, नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांचे वडील पद्माकर घोलप, नगरसेवक सलीम शेख यांच्या आई जैबुन्नीसा शेख यांच्याबरोबरच अभिनेत्री स्मिता तळवलकर, संगीत अभ्यासक मोहन नाडकर्णी, तसेच माळीण दुर्घटनेतील मृत ग्रामस्थ, मलेशिया विमान दुर्घटनेत ठार झालेले प्रवासी अशा सर्व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून महासभा तहकूब करण्याची सूचना जवळपास सर्वच पक्षांनी केली. विशेष म्हणजे, नगरसेवक डॉ. घोलप यांनी आपल्या वडिलांच्या निधनामुळे महासभा तहकूब करू नये तर सभेतच विकासकामांना मंजुरी देणे हीच आपल्या वडिलांना श्रद्धांजली ठरेल, असे पत्र दिले असतानाही मनसेनेच सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर दिवगंतांना मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर लगेचच कॉँग्रेस गटनेतेपदी कांबळे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे बाके वाजवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यानंतर शोकमग्न होऊन पुन्हा महासभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे शोकसभेतच या नियुक्तीची घोषणा करणे इतके महत्त्वाचे होते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौरांनी बुधवार, दि. १३ रोजी महासभा बोलावली असून, दोन दिवसांनीदेखील ही नियुक्ती होऊ शकली असती. (प्रतिनिधी)