शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीतील कुमावतनगरमध्ये गोळीबार

By admin | Updated: November 6, 2015 23:43 IST

नागरिक भयभीत : तिसरी घटना

पंचवटी : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील सराईत गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे़ गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या वादातून चौघा संशयितांनी हवेत गोळीबार केल्याची घटना पेठरोडवरील कुमावतनगरमध्ये घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे २५ आॅक्टोबरला हिरावाडीत दोन गटांमध्ये वाद होऊन त्यांनी गोळीबार केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये होती़ मात्र, पंचवटी पोलिसांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले होते़अशोक ऊर्फ नाना मुरलीधर कारवाल (वय ३७, रा. कुमावतनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी संशयित योगेश दत्तू क्षीरसागर (रा. म्हसोबानगर), दीपक (पूर्ण नाव नाही) व त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. कारवाल व क्षीरसागर यांच्यामध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या वादातून कारवाल यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता़ तेव्हापासून हे वाद सुरूच होते़ गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कारवाल पत्नीसमवेत घराबाहेर उभे असताना संशयित योगेश व दीपक यासह त्यांचे साथीदार तिथे आले व त्यांनी कारवाल यांच्या पत्नीला शिवीगाळ करीत निघून गेले.दरम्यान,हा प्रकार कारवाल यांनी माजी नगरसेवक कमलेश बोडके यांना सांगितल्यानंतर ते कुमावतनगरला आले व दोघांमधील वाद मिटविण्यासाठी संशयिताना बोलावून घेतले़ यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास संशयित क्षीरसागर, दीपक हे आपल्या दोन साथीदारांसह सिल्व्हर रंगाच्या इंडिका गाडीतून आले. यावेळी कमलेश बोडके यांनी दोघांना समोरासमोर आणून त्यांच्यातील वाद मिटवून दिले; मात्र या सर्व प्रकारानंतर योगेश क्षीरसागर हा त्याच्या साथीदारांसमवेत इंडिका गाडीतून जात असताना त्याने अचानकपणे त्याच्या जवळील गावठी पिस्तूलातून हवेत गोळीबार करून पलायन केले. यामुळे परिसरात घबराट पसरली होती़ (वार्ताहर)

पंचवटीत गोळीबाराच्या तीन घटना

  • गत महिनाभरात आडगाव व पंचवटी परिसरात हवेत गोळीबाराची ही तिसरी घटना आहे़ पहिली घटना धात्रकफाटा परिसरात घडली असून एका व्यावसायिकाकडील रोकड लुटण्यासाठी गोळीबार करून पलायन केल्याची घटना घडली होती़. या घटनेत संबंधित व्यावसायिक जखमीही झाला होता़
  • दुसरी गोळीबाराची घटना हिरावाडीत परिसरात दोन गटांमधील वादामुळे झाली; मात्र या घटनेचा पोलिसांनी इन्कार केला होता़ .
  • तिसरी गोळीबाराची घटना कुमावतनगरमध्ये गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली़