शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशामक बंबाला मिळेना वाट़़़

By admin | Updated: December 21, 2014 00:42 IST

अग्निशामक बंबाला मिळेना वाट़़़

नाशिक : आगीच्या घटनेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचविणे गरजेचे आहे याचे भान अग्निशामक दलाला नेहमीच असते वा त्यांना ते ठेवावेही लागते़ कारण वेळेवर न पोहोचल्यास त्याचे गंभीर परिणाम त्यांना ठावूक असतात़ अग्निशामक दलाला अशा घटनांच्या वेळी शहर वाहतूक शाखा, पोलीस आणि नागरिक यांनी सहकार्य करणे गरजेचे असते़ मात्र दुर्दैवाने शनिवारी कोठुळे वाड्याला लागलेल्या आगीत हे सहकार्य दिसून आले नाही़ सीबीएसपासून ते घारपुरे घाटापर्यंत झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अग्निशामक दलाला घटनेपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला़ रविवार पेठेतील गाडगीळ गल्लीतील कोठुळे वाड्याला आग लागल्यानंतर पंचवटी, सिडको, सातपूर, शिंगाडा तलाव या सर्व ठिकाणांहून अग्निशामक बंबांना पाचारण करण्यात आले़ मात्र हे बंब घटनास्थळी वेळेवर पोहोचूच शकले नाही़ याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे शहरातील वाहतूक समस्या़ सीबीएसपासून ते अशोकस्तंभापर्यंत आणि त्याही पुढे घारपुरे घाटापर्यंत वाहतुकीची कोेंडी झाली होती़ या घटनेची माहिती असणाऱ्या नागरिकांनी याची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला दिली़ मात्र या नागरिकांना मनुष्यबळ कमी आहे, आम्हाला इतकेच काम आहे का अशा प्रकारची उत्तरे ऐकायला लागली़वास्तविक पाहता कोणत्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडल्यानंतर मदतीसाठी जाणाऱ्या वाहनांना रस्ता मोकळा करून देणे हे पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेचे तसेच सुज्ञ नागरिकांचेही काम आहे़ परंतु सुज्ञ नागरिक जर आपले कर्तव्य विसरत असतील तर त्यांना कायद्याने धडा शिकविणे हे पोलिसांचे काम आहे़ जेणे दुर्दैवी घटना घडलेल्या ठिकाणी मदत लवकर पोहोचेल व आर्थिक व जीवितहानी होण्यापासून वाचेल़ पोलिसांच्या भूमिकेबाबत या ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात होती़