शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कर्तबगारी, परंतु वादग्रस्तही

By admin | Updated: February 15, 2017 00:13 IST

कर्तबगारी, परंतु वादग्रस्तही

इतिहास चाळतानामहापालिकेच्या पहिल्या महिला महापौरपदाचा बहुमान डॉ. शोभा बच्छाव यांना मिळाला. त्यांच्या कारकिर्दीत अनेक विषयांना मुहूर्त लाभला काही भूमिपूजन, तर काही उद््घाटने झाली. त्यात फाळके स्मारकाचे उद््घाटन हा प्रमुख एक भाग होता. नाशिककरांसाठी पहिला बॉलिवूड स्टार शो यानिमित्ताने पहायला मिळाला. अर्थात, त्यावेळी गृहमंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी स्वारस्य घेतले होते. त्याचबरोबर थेट जलवाहिनीचे लोकार्पण झाले. १४ पूल मंजूर झाले तसेच यशवंतराव स्मृती तारांगणाचे भूमिपूजन अशा अनेक गोष्टी झाल्या. अर्थात, कामे होत राहिली तरी त्या काळात वादग्रस्त कामे झाल्याने त्यापासून त्या वाचल्या नाहीत. विकास आराखड्यातील आरक्षणे बदलणे विशेषत: जुन्या पोलीस आयुक्तालयाचा झोन बदलणे अशा अनेक मुद्द्यांवरून त्या वादग्रस्त ठरल्या. त्यावेळी जागरूक नागरिकांनी आरक्षण हटविण्याच्या विरोधात काढलेला मोर्चा हा लक्ष्यवेधी ठरला. महापालिकेच्या अंदाजपत्रकात महापौर आश्वासन निधी नावाचा अजब प्रकार त्यावेळी बच्छाव यांच्या कारकिर्दीतच झाला. महापालिकेची शेकडो एकर जमीन विशेषत: बेघरांसाठी घरांचे आरक्षण असलेली जमीन म्हाडाच्या अख्त्यारित परस्पर वर्ग केल्याने त्यावेळच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक प्रतिभा भदाणे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले. दूषित पाण्याचा पुरवठा होतो, म्हणून दोष शोधून शुद्ध पाणीपुरवठा करण्याऐवजी पाणी शुद्धीकरणासाठी औषधी ट्यूबची खरेदी हा विषय सभागृहात गाजला, असे विषय गाजले. नोकरभरती हा विषय तर कहर होता. तीन नगरसेवक मिळून एक अभियंता असा भरतीचा अजब कोटा त्यावेळी निघाला. तसेच नोकरभरतीत इतकी वशिलेबाजी झाली की एका आध्यात्मिक गुरूनेदेखील भरती मोहिमेत हात धुवून घेतल्याची चर्चा झाली होती. केवळ बच्छाव यांच्या काळात हे विषय गाजले असले तरी त्यातून प्रशासनाचे अनेक अधिकारी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहिले. तत्कालीन महिला आयुक्त सुजाता सौनिक त्याला अपवाद ठरल्या नाहीत. महापालिकेच्या आयुक्तपदी कृष्णकांत भोगे यांची नियुक्ती झाली आणि अनेक विषयांना चाप बसला.  - संजय पाठक