शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांमधील ‘वैष्णव’ शोधून निलंबित करा

By admin | Updated: August 12, 2014 02:01 IST

ग्रामसेवकांमधील ‘वैष्णव’ शोधून निलंबित करा

 

नाशिक : दीड कोटीची कामे परस्पर मंजूर करणाऱ्या आरोग्य विभागातील चंद्रकांत वैष्णव याच्यावर ज्याप्रमाणे तत्परतेने निलंबनाची कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे नाशिक तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायतींनी बिनशेती कर देयक न बजावल्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले असून, या प्रकरणी दोषींवर कारवाईचा पंचायत समितीचा ठरावही झाला आहे. अशा दोषी ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, या मागणीचे निवेदन पंचायत समिती सभापती अनिल ढिकले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना दिले आहे.विशेष म्हणजे, या पत्रातच तालुक्यातील गंगाम्हाळुंगी, गोविंदपूर, शास्त्रीनगर, गणेशगाव (त्र्यंबकेश्वर), कश्यपनगर येथील राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामे अपूर्ण सोडून नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणाऱ्या संबंधित ग्रामसेवकांवरही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी ढिकले यांनी केली आहे. याच ठरावानुसार ग्रामपंचायतींनी बिनशेती कर (एन.ए) देयक न बजावल्यामुळे ग्रामपंचायतींचे व पर्यायाने शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा सर्वच कर्मचाऱ्यांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती अनिल ढिकले यांनी केली आहे. (प्रतिनिधी) निवडणूक याचिकेवर २२ पासून सुनावणीनाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत अंतिम सुनावणी येत्या २२ आॅगस्टपासून होणार असल्याची माहिती अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांनी दिली.ंविधान परिषदेच्या निवडणुकीत सहाणे आणि राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांच्यात लढत झाली. त्यात समसमान मते मिळाल्याने चिठ्ठी पद्धतीने जाधव यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यासंदर्भात अ‍ॅड. सहाणे यांनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता २२ आॅगस्टपासून अंतिम सुनावणी होणार असून, याचिकाकर्ते तसेच प्रतिवादी अंतिम युक्तिवाद करणार आहेत.