शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

‘टिप्पर’ला आर्थिक मदत; ठेकेदाराला तुरुंगवास

By admin | Updated: July 29, 2016 01:23 IST

ठाणे येथून अटक : अतुल झेंडे यांनी आवळल्या संशयिताच्या मुसक्या

 नाशिक : सिडकोमध्ये दहशत माजविणाऱ्या ‘टिप्पर’गॅँगच्या मोक्क्यामधील गुन्हेगारांना आर्थिक रसद पुरविणारा शासकीय ठेकेदार स्वप्नील हेमंत गोसावी यास सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी ठाणेमधून गुरुवारी मध्यरात्री अटक केली. त्यास गुरुवारी (दि.२८) जिल्हा न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली (मोक्का) न्यायालयीन कोठडीत असलेल्या टिप्परच्या दहा संशयितांना गोसावी हा वेळोवेळी आर्थिक मदत करत असल्याचा पोलिसांना संशय होता. तपासी अधिकारी सहायक आयुक्त अतुल झेंडे यांनी पोलीस पथकासह ठाणेमधून मध्यरात्री गोसावीच्या मुसक्या आवळल्या. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली गोसावीला पोलिसांनी अटक केली. त्यास सकाळी न्यायालयासमोर हजर केले असता मोक्का न्यायाधीश उर्मिला फलके-जोशी यांनी येत्या पाच आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. अजय मिसर यांनी कामकाज पाहिले, तर गोसावी याच्याकडून अ‍ॅड. अक्षय कलंत्री व दीपक ढिकले यांनी युक्तिवाद केला.टिप्पर गॅँग, परदेशी गॅँगसारख्या टोळ्यांशी संबंध ठेवणाऱ्या छुप्या गुन्हेगारांचा पोलीस शहरात व शहराबाहेरही शोध घेत आहेत. याअंतर्गत सहायक आयुक्त चव्हाण यांनी अजय बागुल यास मोक्काखाली अटक केली, तर दुसरीकडे झेंडे यांनी शासकीय ठेकेदार गोसावीच्या मुसक्या आवळल्या. एकू णच छुप्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी बडगा उगारला असून, भूमिगत गुन्हेगारांचा शोध घेत शहरात वाढलेल्या गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकली जात आहे. (प्रतिनिधी)